घरताज्या घडामोडीUddhav Thackeray Poharadevi : हे सरकार एक फूल दोन हाफ, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Poharadevi : हे सरकार एक फूल दोन हाफ, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. पोहरादेवीत उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. शेतकरी आत्महत्या थांबल्या आहेत का? बुलढाण्याला गेलो होतो, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची क्लिप ऐकवली होती. तेव्हा मध्यप्रदेशात जाऊन ते म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावे. आज तुम्ही एक फूल दोन हाफ, त्यांनी आता शेतकऱ्यांचे वीज बील माफ करुन दाखवावे. आमचं सरकार तीन चाकांचं म्हणून हिनवलं जात होतं. आता तुमचं त्रिशूळ झालं? घरी बसवून मी महाराष्ट्र चालवून दाखवला. तसा महाराष्ट्र चालवून दाखवा, महाराष्ट्राचे आशीर्वाद घेऊन दाखवा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार घणाघात केला.

मी आजही एकटा आहे, असं त्यांना वाटतं. परंतु बाळासाहेब ठाकरे हे अनेकांच्या मनात भिनलेले आहेत, त्यामुळे तुम्ही कितीही बोलतात, तरी त्यांच्या मनातून काढू शकत नाहीत. आपण सगळे लहानपणापासून राजकारण पाहत आलेले आहोत. राजकारण म्हणजे फोडाफोडीचं राजकारण हे आपल्याला माहितीये. पण पक्ष संपवून टाकण्याची वृत्ती आपल्याला संपवावी लागणार आहे. पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं, आता खोक्यातून सरकार जन्माला यायला लागली आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

भाजपला ठाकरे नको, शिवसेना हवी, माझा कारभार वाईट असेल तर मला जनता प्रश्न विचारेल. बंडखोरांचा मालिक एकच आहे. मत कुणालाही द्या, सरकार माझचं येणार, अशी भाजपची निती आहे. आता राष्ट्रवादी फोडायची काय गरज होती, असा प्रश्ना उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मोदी म्हणाले, राष्ट्रवादी भ्रष्ट आता त्याच नेत्यांसोबत मोदींचा फोटो आहे. आमदार, खासदार गेलेत तरी दमदार शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. एक देश एक पक्ष आम्हाला चालणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मणिपूर शांत करायचे असेल तर मी तोडगा देतो. तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर कार्यककर्त्यांवर ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सच्या धाडी टाकताना, तशाच धाडी मणिपूरमध्ये टाका, तेही तुमच्या पक्षात येऊन जातील. मणिपूर शांत होईल. पोहरादेवीच्या विकासाचा आराखडा तयार केला होता. आपल्या खासदार ताई पळाल्याच होत्या. एक दिवस फोटो आला पंतप्रधानांना राखी बांधायच्या. ज्या भ्रष्ट आहेत असे आरोप झाले, त्यांच्याच हाताने पंतप्रधांनांनी राखी बांधून घेतली. मी काँग्रेससोबत गेलो की, भाजप म्हणते हिंदूत्व सोडलं. यांनी मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार स्थापन केलं. पीडीपीच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा त्यांनी हिंदूत्व सोडलं नाही का? असं, हिंदूत्वाचं थोतांड, बेगडी हिंदूत्व आम्हाला मान्य नाही, असं ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हजारो लाखो लोकांचे पोहरादेवी हे तीर्थक्षेत्र आहे. त्याचा विकास करुन दाखवायचा आहे. मोदी नावाचं नाणं महाराष्ट्रात चालेनासं झालं आहे. कर्नाटकात बजरंगबली देखील त्यांना पावला नाही. आता आई जगदंबेने मतांचं शस्त्र आपल्या हातात दिलं आहे. त्या शस्त्रानं त्यांना गाडणार आहोत की नाही? सहस्त्रभुजांची भवानी माझ्यासोबत आहे. गद्दारांना गाडणं हे जगदंबेचं एक काम आहे. या गद्दारांना गाडण्याची ताकद आई जगदंबा देईल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.


हेही वाचा : Uddhav Thackeray : हप्ते घेणाऱ्याला मंत्री कुणी केला? उद्धव ठाकरेंचा राठोडांवर हल्लाबोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -