घरक्रीडाINDW Vs BANW 2023: भारतीय महिलांनी बांगलादेशचा उडवला धुव्वा; 1-0 अशी आघाडी

INDW Vs BANW 2023: भारतीय महिलांनी बांगलादेशचा उडवला धुव्वा; 1-0 अशी आघाडी

Subscribe

भारतीय महिला संघाने बांगलादेशचा धुव्वा उडवला असून ट्वेंटी-20 मालिकेत विजयी सलामी दिली आहे. या विजयासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान बांगलादेशच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे बांगलादेशचा संघ 20 ओव्हर्समध्ये 5 बाद केवळ 114 धावा करू शकला. 115 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सहज लक्ष पूर्ण केलं.

भारतीय महिला संघासाठी कर्णधार हरमनप्रीतने अवघ्या 35 चेंडूत नाबाद 54 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. यादरम्यान तिच्या बॅटमधून 6 चौकार आणि 2 षटकार निघाले. त्याचवेळी सलामीवीर स्मृती मानधनाने 34 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 38 धावांची खेळी केली. तत्पूर्वी, शेफाली वर्मा शून्यावर बाद झाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जने 14 चेंडूंत दोन चौकारांसह 11 धावा केल्या. तर हरमनप्रीतसह यष्टीरक्षक यास्तिका भाटिका 9 धावांवर नाबाद माघारी परतली.

- Advertisement -

भारतीय संघाने 16.2 षट्कांमध्ये 3 बाद 118 धावा करून 22 चेंडू राखून मोठा विजय मिळवला. हरमनप्रीतने अर्धशतकी खेळी केल्यामुळे हरमनप्रीतला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. बांगलादेशच्या महिला संघाची सुरूवात संथ झाली. पाचव्या षटकात 27 धावांवर पहिली विकेट पडली. शमीमा सुलतान 13 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 17 धावा करून बाद झाली.

- Advertisement -

हेही वाचा : Duleep Trophy : सामना जिंकण्यासाठी जयंत यादवच्या संघाकडून लाजिरवाणे कृत्य; कारवाई होणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -