घरमहाराष्ट्रखोपोलीत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

खोपोलीत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

Subscribe

वारंवार लेखी सूचना देऊनही अनधिकृत बांधकाम जैसे थे ठेवणार्‍यांवर अखेर नगर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. बुधवारी दुपारनंतर सुरू झालेली ही कारवाई यापुढे सुरूच राहणार आहे, अशी माहिती पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकार्‍याने दिली.

शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाल्याने जागांचे भावही वाढले आहेत. स्वाभाविक गेल्या काही वर्षांत घर, दुकानांसमोरील किंवा मिळेल त्या मोकळ्या जागेवर अनधिकृत बांधकाम बिनदिक्कतपणे करण्याचे पेव फुटले आहे. ही अनधिकृत बांधकामे स्वतःहून हटविण्यासाठी पालिकेने संबंधितांना वारंवार नोटिसा धाडल्या होत्या. मात्र किरकोळ अपवाद वगळता बरीचशी बांधकामे तशीच ठेवण्यात आली. शेवटी कारवाईचा बडगा उचलण्याचे आदेश मुख्याधिकार्‍यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार कारवाई सुरूही झाली, मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि दिवाळीमुळे कारवाई थंडावली होती. आता पुन्हा एकदा पालिकेने कारवाईला प्रारंभ केला आहे.

- Advertisement -

काटरंग येथील अनधिकृत बांधकामे, स्टॉल यावर जेसीबी चालविण्यात येऊन ती पाडण्यात आली. तसेच बेकायदेशीर हातगाड्यांवरही कारवाई करण्यात आली. पालिकेच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -