घरमहाराष्ट्रवेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री राणे करणार मध्यस्थी?

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री राणे करणार मध्यस्थी?

Subscribe

मुंबई – गुजरातकडे वळलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात आणण्यसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मध्यस्थी करणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात नारायण राणेंनी आज सकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यंत्री शिंदेंची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राणे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहेत.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्याने राजकीय वाद पेटला असून त्यामुळे या प्रकरणात तोडगा काढण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून होत आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी राज्यात अनुकूल वतावरण आहे. महाराष्ट्रात कंपनीला जास्त सवलत दिली जाईल, असे मुद्दे एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींकडे माडण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर  जोरदार टीका केली आहे. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून पलटवार करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्री शिंदेही हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा, यासाठी आग्रही असल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे. नारायण राणेंनी सकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर राणे हे शिंदे आणि फडणवीसांसह पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -