घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू, फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पावरून अजित पवारांची टीका

महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू, फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पावरून अजित पवारांची टीका

Subscribe

जळगाव – विरोधी पक्षनेते अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चाळीसगावात असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यांनी हा प्रकल्प राज्यातच राहावा म्हणून पाठपुरावा केला पाहिजे. प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प राज्यात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न झाले होते. पण, हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली आहे. या प्रकल्पासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा सुरुवातीला विचार करण्यात आला होता. आमचा कोणत्याही राज्याला विरोध नाही. मात्र, राज्यातील प्रकल्प कोणाच्या तरी दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल तर ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केला पाहिजे –

आम्ही ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली असून हा प्रकल्प राज्यातच राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जावे, प्रयत्न करावेत. मुख्यमंत्र्यांचे मोदींशी चांगले संबंध असल्यामुळे  त्यांनी हा प्रकल्प राज्यातच रहावा म्हणून पाठपुरावा केला पाहिजे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होत असताना त्यावेळी आमच्या सरकारने प्रकल्पाला विविध सवलती देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली होती. या प्रकल्पासाठी पुणे येथील तळेगावातली जमीन निश्चित करण्यात आली होती, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

पर्यावरणाचे संवर्धन करणारे प्रकल्प राज्यात आले पाहिजेत –

प्रकल्पासाठी त्या ठिकाणी सर्व गोष्टी पूरक होत्या. हा प्रकल्प गुजरातला नेल्यानंतर आता गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे. आमचे तर म्हणणे आहे की हा प्रकल्प पण महाराष्ट्रातच व्हावा आणि दुसरा प्रकल्पही महाराष्ट्रात येऊ द्यावा. ज्या प्रकल्पामुळे राज्याचे हित होत असेल पर्यावरणाचे संवर्धन राखले जात असेल, असे प्रकल्प महाराष्ट्रात आलेच पाहिजेत, या मताचे आम्ही असल्याचेही अजित पवार म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -