घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लढणार; 'सपा'सोबत करणार युती

राष्ट्रवादी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लढणार; ‘सपा’सोबत करणार युती

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस आगामी उत्तर प्रदेशची २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी समाजवादी पक्षासोबत युती करणार आहे. या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस केके शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी मंगळवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत दिली.

उत्तर प्रदेशची अवस्था बिकट आहे. राज्याचा विकास करावा लागेल. त्यासाठी आम्ही समाजवादी पक्षासोबत एकत्र निवडणूक लढवणार आहोत. या संदर्भात सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा झाली आहे आणि आता केवळ जागांचं वाटप होणं बाकी आहे, अशी माहिती केके शर्मा यांनी दिली.

- Advertisement -

पक्षप्रमुख शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसला तरुण आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवावा लागेल. कारण तेथील भाजप सरकार लोकशाहीला धोका निर्माण करीत आहे. जो कोणी आवाज उठवत आहे त्याच्यावर कारवाई केली जात आहे आणि त्याचा आवाज दडपला जात आहे, असं शर्मा म्हणाले.

बरदस्तीने धर्मांतर करणं चुकीचं आहे, परंतु जर कोणी स्वत: च्या इच्छेनुसार धर्मांतर करीत असेल तर त्याला हरकत नसावी. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव म्हणाले की, १ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर ‘राज्य वाचवा, संविधान वाचवा’ आंदोलन सुरू करणार आहे, ज्यामध्ये शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवर लक्ष्य केंद्रीत केलं जाणार आहे. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील परिस्थिती बिकट आहे. शेतकरी त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत पण त्यांचं ऐकलं जात नाही. या अभियानात आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्यांच्या सोबत आहे आणि ते गावोगावी जाऊन प्रचार करतील.

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -