घरताज्या घडामोडीओबीसी आरक्षणाबाबत कोणी कितीही दबाव आणला तरी भूमिकेवर ठाम, वडेट्टीवार यांचा इशारा

ओबीसी आरक्षणाबाबत कोणी कितीही दबाव आणला तरी भूमिकेवर ठाम, वडेट्टीवार यांचा इशारा

Subscribe

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झआली आहे. तसेच निवडणुक पुढे ढकलण्याबाबतही सरकार सकारात्मक

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत राज्यातील निवडणूका होऊ देणारन नाही असे स्पष्ट मत काँग्रेस नेते आणि राज्येच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. राज्य सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर घेरलं गेलय मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणही रद्द झाल्यानं ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. तसेच मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्या आली असली तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात आहे. यामुळे मुंबईकरांना लोकल सुरु करणे शक्य नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकीतील ओबीसी आरक्षण रद्द झालं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर आम्ही ठाम असून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता उत्तरात वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. जोपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत अशी भूमिका मांडण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झआली आहे. तसेच निवडणुक पुढे ढकलण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे. परंतु कोणाचा कितीही दबाव टाकला तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत या निवडणुका होऊ नयेत आणि मी मंत्री असलो तरी या निवडणुका होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

लोकल प्रवासासाठी मोठी प्रतिक्षा

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी मुंबईत कोरोनाचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मुंबईकरांचे सध्या सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी कधी मुभा दिली जाईल याकडे लक्ष लागून राहिले आहे. पण आता मुंबईकरांना अजून लोकल प्रवासासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागणार आहे असे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -