ज्याने कोणी हे केले असेल त्याने समोर यावे, काही चुका झाल्या असतील तर बोलू – वसंत मोरे

Vasant More commented on the threat to his son

पुण्यातील माजी नगरसेवक आणि मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशला अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता. यावर रुपेशला आलेल्या धमकीनंतर मी आणि माझे कुटुंबीय व्यथित झालो आहोत, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे दिली असून वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वसंत मोरे काय म्हणाले –

यावर मला यापूर्वी अगदी वेपनदाखवून धमकवण्याचे प्रकार झाले आहेत. मात्र, माझ्या घरापर्यंत कधी हा प्रकार आला नव्हता. यासर्व प्रकारानंतर आम्ही डिस्टर्ब झालो आहोत, असे वसंत मोरे म्हणाले. याप्रकरणी कोणावर संशय नाही. मात्र, पोलिसांत तक्रार दिली आहे, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.

कोठे घडला प्रकार –

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी लावलेली गाडी संध्याकाऱी सहावाजता तेथील काम उरकल्यानंतर काढली. यावेळी आम्ही दोघेही सोबत होते. तो त्याच्या मित्रांबरोबर मोरेबागला गेला आणि मी कात्रजला आलो. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी त्याचा फोन आला. मला बोलयचे आहे, प्रॉब्लेम झाला आहे, असे तो म्हणाला. यानंतर त्यांने चिठ्ठीसंबंधी सांगितले. व्हाट्सअॅपवर त्याचा फोटो पाठवला. सावध राहा रुपेश असे त्यात लिहिले होते. ही चिठ्ठी गाडीच्या वायपरला लावली होती, असे वसंत मोरे म्हणाले.

 पोलीस करत आहेत तपास –

या प्रकरणाची नोंद भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत,असे वसंत मोरेंनी सांगीतले. धमकी विषयी त्यांनी काल फेसबुक पोस्टही केली होती. यावर आपण राजकारणात असल्यामुळे कुटुंबीयांना त्रास होत आहे. मात्र, ज्याने कोणी हे केले असेल त्याने समोर यावे. काही चुका झाल्या असतील तर बोलू. पण उगाचच काहीतरी वेगळे करायचे, मला आणि माझ्या कुटुंबाला डिस्टर्ब करायचे, अशा गोष्टी करून काहीच साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.