घरदेश-विदेशLok Sabha 2024 : मराठी स्वाभिमान तुमच्या शब्दकोशात नाहीच... एनसीपी-एसपीच्या निशाण्यावर भाजपा

Lok Sabha 2024 : मराठी स्वाभिमान तुमच्या शब्दकोशात नाहीच… एनसीपी-एसपीच्या निशाण्यावर भाजपा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची मुंबईत जाहीर सभा झाली. तर, आता भाजपाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ बनवून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) भाजपावर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा – Shiv Sena : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात जुन्या शिवसैनिकाला उमेदवारी? उद्धव ठाकरेंची भाजपविरोधात खेळी

- Advertisement -

भाजपाने आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, मोदी सरकारमुळे देश कसा चौफेर प्रगती करत असल्याचे दाखविले आहे. मात्र ही जाहिरात हिंदी असल्यावरून एसीपी-एसपीने भाजपावर टीका केली आहे. भाजपाने प्रचार यंत्रणेचा नारळ फोडला असला तरी, हा नारळच नेमका नासका निघाला, असे ट्वीट एनसीपी-एसपीने केले आहे.

- Advertisement -

भाजपा महाराष्ट्राला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची ही पहिलीच जाहिरात नेमकी ‘मराठी’ भाषा सोडून ‘हिंदी’ भाषेत प्रसारित करावी लागत आहे, असे सांगून, मराठी स्वाभिमान तर तुमच्या शब्दकोशात नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या दरबारी गहाण ठेवण्याचे कृत्य करून जे पाप तुम्ही केले आहे, ते महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही आणि विसरणारही नाही, असे एनसीपी-एसपीने सुनावले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच उतावळे इच्छुक स्वत:च चढले उमेदवारीच्या बोहल्यावर

एकीकडे महाराष्ट्राच्या युवकांना रोजगार मिळवून देणारे हक्काचे उद्योग प्रकल्प इतर भाजपशासित राज्यात स्थलांतरित करायचे आणि दुसरीकडे रोजगाराच्या ढोंगी गप्पा मात्र जाहिरातीतून केल्या जात आहेत. जाहिरातींमधून आता विकासाची गॅरंटी नव्हे तर, ‘खोटं बोल पण रेटून बोल’ची गॅरंटी देण्यासाठी आता भाजपा सज्ज झाला असल्याचा टोलाही या ट्वीटमध्ये लगावण्यात आला आहे.

हेही वाचा – Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडी सात जागांवर काँग्रेसला देणार पाठिंबा; खर्गेंना लिहिले पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -