घरमहाराष्ट्रगणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार?

गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार?

Subscribe

येत्या १४ ते १५ सप्टेंबर रोजी राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर लगेचच प्रचारांची रणधुमाळी राज्यात पाहायला मिळेल, असे समजते. 

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असला तरी दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचे वेधही राजकारण्यांना लागले आहेत. १४ व्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधी वाजणार याची उत्सुकता नेत्यांना आहे. गणेशोत्सवानंतर लगेचचं आचारसंहिता लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या १४ ते १५ सप्टेंबर रोजी राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर १५ ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर लगेचच प्रचारांची रणधुमाळी राज्यात पाहायला मिळेल, असे समजते.

पुढील आठवड्यात म्हणजेच २ ते १२ सप्टेंबर या कालावधीत राज्यात गणेशोत्सव आहे. त्यामुळे १२ सप्टेंबरला गणेश विसर्जन झाल्यानंतर लगेचच सप्टेंबरच्या दुसर्‍याच आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. २०१४ मध्ये गणेशोत्सवानंतरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि १२ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान होऊन १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला होता. यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. सध्याच्या १३ विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असल्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कधीही होऊ शकते. तर दिवाळी २५ ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्याआधी मतदान होईल, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘चौकीदार चोर है’ वक्तव्यावरुन राहुल गांधींना कोर्टाचा समन्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -