घरताज्या घडामोडी...तर मुख्यमंत्री मोठे आहेत की उपमुख्यमंत्री?, ठाकरेंच्या खुर्चीवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर...

…तर मुख्यमंत्री मोठे आहेत की उपमुख्यमंत्री?, ठाकरेंच्या खुर्चीवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर निशाणा

Subscribe

संभाजीनगरमध्ये २ मार्च रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी उपस्थिती लावली. मात्र, सर्व नेत्यांना व्यासपीठावर बसण्यासाठी एकसारख्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. यावेळी ठाकरेंच्या खुर्चीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्यामध्ये कोणाची खुर्ची मोठी, कोणाची लहान हे आम्ही ठरवू, विरोधकांना हे ठरवण्याची गरज नाही. आमच्या कुठल्या नेत्यानं जर असं काही बोललं असतं तर तो खरा प्रश्न असता. उलट आम्ही आज पाहतोय की, मुख्यमंत्री मोठे आहेत की उपमुख्यमंत्री मोठे आहेत. त्यामुळं यावर अधिक काही बोलण्याची गरज मला वाटत नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -

संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर सभा स्थळावर गोमुत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण करण्याचा अघोरी प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात त्यांची जी यात्रा निघतेय त्याला प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळं आता गायी कापून खा आणि गोमुत्र शिंपडत जा, असा नवा फंडा त्यांनी सुरु केला असेल. जेव्हा सत्ता जाण्याची भीती असते तेव्हा असे प्रयोग केले जातात, असं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपवर टीका केली.

सुप्रीम कोर्टानं सरकारला नपुंसक म्हणावं यापेक्षा दुसरी चपराक काय असू शकते. खरंतर त्यांच्यावरच आता गोमुत्र शिंपडण्याची पाळी आता आली आहे, असंही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं.

- Advertisement -

हेही वाचा : वाझेमागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय?, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -