घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र बंद नव्हे तर जाळपोळ आणि तोडफोड!

महाराष्ट्र बंद नव्हे तर जाळपोळ आणि तोडफोड!

Subscribe

महाराष्ट्र बंदला हिंसक वळण आले आहे. राज्यभरामध्ये मराठा आरक्षणावरुन आंदोलन सुरु आहेत. अनेक भागामध्ये आक्रमक झालेल्या आंदोलकांनी गाड्याची तोडफोड, जाळपोळ, रास्तारोको आणि दगडफेक आंदोलन केले आहे. तर औरंगाबाद, जालना आणि नांदेडमध्ये आंदोलक संतप्त झाले आहेत. त्यांनी अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाची गाडी आणि पोलिसांची गाडी जाळली.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर वगळता महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदचे हे आंदोलन पेटले आहे. औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीमध्ये उडी मारली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे मराठा आंदोलक आणखी आक्रमक झाले. याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. या आंदोलनाला अनेक भागामध्ये हिंसकवळण आले आहे. संतप्त आंदोलक रास्तारोको, जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक करत आहे.

शेगावमध्ये एसटी बसवर दगडफेक

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमुळे तणावाचे वातावरण असल्याने अनेक ठिकाणी दुकान, बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील शेगावमध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत टायर जाळून आंदोलन केले. रास्तारोको करत एसटी बसवर दगडफेक करत गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. यामध्ये एसटी बस चालक आणि कंडक्टर जखमी झाले आहे.

- Advertisement -

अॅम्ब्युलन्स आणि अग्निशमन दालाच्या गाड्यांची तोडफोड

जालनामध्ये या आंदोलनाला हिंसकवळण आले आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्य़े एक पोलीस जखमी झाला आहे. तसंच अॅम्ब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या गाड्याची तोडफोड केली. हिंगोलीमध्ये पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक करत पेटवून दिली. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसंच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

नांदेडमध्ये पोलीस अधिक्षकांच्या गाडीवर दगडफेक

संतप्त आंदोलकांनी पोलीस अधिक्षकांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये ४ ते ५ आंदोलक जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आंदोलकांचा देखील समावेश आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्तोरोको करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

५ आंदोलनकांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

आरक्षणाच्या मागणीवरुन सोमवारी काकासाहेब शिंदे यांने जलसमाधी घेतली. त्यानंतर आज आंदोलना दरम्यान आणखी पाच आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. कन्नड तालुक्यातील ३३ वर्षाच्या गुड्डू सोनावणे या तरुणाने नदीमध्ये उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या गुड्डूवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आंदोलना दरम्यान ५५ वर्षाच्या जगन्नाथ सोनवणे यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी शिवाजी चौकामध्ये एका आंदोलक तरुणाने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेणअयाचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले. बीड जिल्ह्यामध्ये दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. गेवराई तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -