घरमहाराष्ट्रथेट सरपंचपदांसह १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात

थेट सरपंचपदांसह १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात

Subscribe

ग्रामपंचायतीच्या संरपचाचींसुद्धा थेट जनतेमधून निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या मतदानाचा निकाला १७ ऑक्टोबर रोजी हाती येणार आहे. 

मुंबई – राज्यातील १ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यात मतदान होणार असून थेट सरपंचपदासाठीही आज मतदान होणार आहे. सायंकाळी पाच पाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येणार आहे.

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील १ हजार १६५ ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान होत आहे. यावेळेस ग्रामपंचायतीच्या संरपचाचींसुद्धा थेट जनतेमधून निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या मतदानाचा निकाला १७ ऑक्टोबर रोजी हाती येणार आहे.

- Advertisement -

या ठिकाणी होत आहे मतदान

ठाणे – कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79.

पालघर – डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70 ( पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 711 सदस्य बिनविरोध तर १० सरपंच बिनविरोध आलेत, तर जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध आहेत )

- Advertisement -

रायगड – अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.

रत्नागिरी – मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.

सिंधुदुर्ग – दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. नाशिक:
इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.

नंदुरबार – अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.

पुणे – मुळशी- 1 व मावळ- 1.

सातारा – जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.

कोल्हापूर – भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.

अमरावती – चिखलदरा- 1.

वाशीम – वाशीम- 1.

नागपूर – रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.

वर्धा – वर्धा- 2 व आर्वी- 7.

चंद्रपूर –भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.

भंडारा – तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.

गोंदिया – देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2.

गडचिरोली – चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -