घरमहाराष्ट्रविवेकानंदांच्या कल्पनेतून भारत साकारणे शक्य - नितीन गडकरी

विवेकानंदांच्या कल्पनेतून भारत साकारणे शक्य – नितीन गडकरी

Subscribe

मी विवेकानंदांच्या कल्पनेतील भारत साकारता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. "नव्या भारताची संकल्पना" या विषयावर आधारित व्याख्यानावर ते बोलत होते.

भारतीय समाजाची रचना ही मूल्याधिष्ठित अशा संस्थानिर्माणावर आधारित आहे. पाश्चिमात्य समाजरचनेत आणि आपल्यातील हा मूलभूत फरक आहे. तिला आधुनिक विचारांची आणि अर्थव्यवस्थेची जोड मिळाली तर स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेतील भारत साकारता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. हिंदू नववर्ष स्वागत समिती (प्रभादेवी-दादर-माहीम)च्या वतीने “मंथन” या मालिकेअंतर्गत आज “नव्या भारताची संकल्पना” या विषयावर नितीन गडकरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सर्वच क्षेत्रात व्हिजनची आवश्यकता

“राष्ट्रवादी विचार हे देशाचा आत्मा आहे. भारत हा विश्वात महाशक्ती व्हावा ही सर्वांचीच भावना आहे. पण त्यासाठी शैक्षणिक, वैज्ञानिक, पर्यावरणीय, आर्थिक अशा सर्वच शासकीय, निमशासकीय, खासगी अशा सर्वच क्षेत्रांत व्हिजनची आवश्यकता आहे. परंतु, आपल्याकडे अनेकदा विचारमग्नतेपेक्षा विचारशून्यतेचाच अधिक प्रभाव दिसून येतो.”अशी टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

नव्या भारताची संकल्पना काय आहे

“नव्या भारताची संकल्पना” या विषयावर विचार मांडताना अनेक निर्माणाधीन आणि विचाराधीन प्रकल्पांची गडकरी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “सध्या देशासमोर वाहनांच्या वाढत्या संख्येचे आणि त्याला जोडून येणाऱ्या इंधनाच्या आयातीचे आव्हान आहे. त्यादृष्टीने प्रवासाचा वेळ व गर्दी कमी करणारे मार्ग आणि इंधनाला पर्याय असणारे बायोफ्युएल या दोन्हीचा विचार करणे आवश्यक आहे. बायोफ्युएलची निर्मिती करून प्रायोगिक तत्वावर वाहतुक सुरू झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेट्रोसह रोरो, क्रूझ ट्रान्स्पोर्ट सीप्लेन अशा विविध सुविधा सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे”

भारतातील धर्मस्थळे आणि अन्य देशांतील धर्मस्थळे यात स्वच्छता, चांगल्या स्थितीतले रस्ते आणि पार्किंग हे मुख्य फरक आहेत. तिथे धर्मस्थळांवर पोहोचण्यासाठी जसे रस्ते आढळतात तसे गंगोत्री, यमुनोत्री येथे आढळत नाहीत. मात्र बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री-यमुनोत्री यांना बाराही महिने जोडणाऱ्या मार्गाचा बारा हजार कोटींचा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मानसरोवर मार्ग, नदीजोड, सागरमाला, लेहलडाखला जोडणारा मार्ग अशा अनेक प्रकल्पांबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -