घरमहाराष्ट्रब्लेझर वापरणार नाही - शिक्षक समिती

ब्लेझर वापरणार नाही – शिक्षक समिती

Subscribe

सोलापूरमधील जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांनी येत्या १९ नोव्हेंबरपासून ब्लेझर वापरावे, असा आदेश प्रशासनाने काढला आहे. मात्र शिक्षक समितीने त्याला विरोध दर्शवला आहे. न्यायालयात जाऊ, पण ब्लेझर वापरणार नाही अशी ठाम भूमिका शिक्षक समितीने घेतली आहे.

सोलापूरमधील जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांनी येत्या १९ नोव्हेंबरपासून ब्लेझर वापरावे, असा आदेश प्रशासनाने काढला आहे. मात्र या आदेशाला शिक्षकांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. एकवेळ गरज पडल्यास होणाऱ्या कारवाईला सामोरे जाऊ. त्याचप्रमाणे वेळ पडल्यास दाद मागण्यासाठी न्यायालयात देखील जाऊ. मात्र कधीही ब्लेझर वापरणार नाही, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने पत्रकार परिषदेत मांडली आहे.

विद्यार्थ्यांना सुविधा पुरवा

सोलापूरमधील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये वीज नाही, पंखे नाहीत, स्वच्छतागृह, पाण्याची सोय नाही तर काही ठिकाणी छताला गळती देखील लागली आहे. मात्र अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना या सर्व सुविधा देण्याकडे लक्ष देण्याऐवजी जिल्हा परिषद प्रशासन विनाकारण शिक्षकांना ब्लेझर वापरणे अनिवार्य करत आहे. ब्लेझर वापरून शिक्षणाची गुणवत्ता वाढणार नाही. त्यामुळे या सूचनांची अंमलबजावणी आम्ही करणार नाही आणि ब्लेझर देखील वापरणार नाही, अशी स्पष्ट भूमिका समितीच्या वतीने घेण्यात आली आहे.

- Advertisement -

संबंधित बातम्या – 

वाचा – स्मार्ट शाळा नंतर आधी छप्पर दुरुस्ती करा; विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालिकेवर रोष

वाचा – विद्यार्थ्यांच्या खांद्यावरून हटेना दप्तराचे ओझे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -