घरमहाराष्ट्रआम्हाला त्यांची नैतिक टेस्ट घ्यायची होती - आदित्य ठाकरे

आम्हाला त्यांची नैतिक टेस्ट घ्यायची होती – आदित्य ठाकरे

Subscribe

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने आज विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. यानंतर बोलताना शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर टीका केली.

आज विधानसभेत पहिल्यांदा एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि शिवसेनेचे आमदार आमने सामने आले. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने आज विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वपक्षीय आमदारांनी भाषणे केली. यावेळी शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि भाजपला सभागृहा बाहेर बोलताना टोला लगावला.

आमदारांनी पक्षाचा व्हीप मोडलेला आहे. आम्ही याचा विरोध उपाध्यक्षांकडे नोदवलेला आहे. त्यांनी देखील हे हाऊसमध्ये रेकार्डवर आनले आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की मतदानाच्या आधी त्यांची  नैतिक टेस्ट घ्यायची होती आम्हाला. एकाही पळालेल्या आमदारांनी आमच्या डोळ्यात डोळे घालून बघायची हिम्मत केली नाही. सगळे डोळे चोरून खाली किंवा दुसरीकडे बघत होते. माझा प्रश्न हाच असनार आहे की यांनी आमच्याकडू डोळे चोरले आहेत. दुसरीकडे बघीतले आहे. पण मतदान संघात गेल्यानंतर मतदार आणि शिवसैनिकांना काय सागणार हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे.

- Advertisement -

कधीपर्यंत  हे चालनार –

मोठ्या सुरक्षेत आमदारांना आणले गेले. त्यांना मिडिया पासून सुद्धा दूर ठेवण्यात आले. कितीवेळ असे चालणार बसमध्ये कधीपर्यंत राहणार येथून परत गुहाटीला जाल गोव्याला जाल. कधीपर्यंत हे चालनार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

शिंदेंवर टीका –

शिवसेनेचे सरकार म्हणजे आम्ही शिवसेना येथे आहोत. आम्ही शिवसेना म्हणून काम करत राहू. काही जणांना राक्षसी महत्व आकांक्षा होत्या. आता त्यांनी विमान हॉटेल यांचे उल्लेख केले. याचा खर्च कोठून झाले हे पण आम्हाला माहित नाही.

तर आमचे म्हणणे ऐकले जाईल –

न्याय प्रक्रियेवर आपला विश्वास असेल आणि विश्वास ठेवावासा वाटत असेल तर शिवसेना म्हणून आमचे म्हणणे ऐकले जाईल. आमच्या पेक्षा त्यांना आव्हाने आहेत. आमदारांनी आमच्या डोळ्यात डोळे घालून बघायची हिम्मत केली नाही. सगळे डोळे चोरून खाली किंवा दुसरीकडे बघत होते. तर मतदार आणि शिवसैनिकांसमोर जाताना  त्यांच्यात किती  हिम्मत असेल ते कळले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -