घरमहाराष्ट्रपुणे"जो दरारा दादा आम्हाला दाखवतात...", Amol Kolhe यांचा Ajit Pawar यांना टोला

“जो दरारा दादा आम्हाला दाखवतात…”, Amol Kolhe यांचा Ajit Pawar यांना टोला

Subscribe

मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी खाजगीत काही चर्चा केली असेल आणि त्यांनी तर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने खासगीतील चर्चा सार्वजनिक करणे योग्य ठरणार नाही, असे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राजनाम्यासंदर्भात म्हणाले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने 27 ते 30 डिसेंबर रोजी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी प्रश्नावर आधारी मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. जो दरारा दादा आम्हाला दाखवतात, तो केंद्राला दाखवावा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लागवाल आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “आपण केंद्र सरकारकडे ठाम मागणी करावी की, आमचा कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. तत्काळ निर्याद बंदी उठवा, दादाचा आणि त्यांच्या आवाजाचा दरारा सर्वांना माहिती आहे. तर दादानी देखील केंद्र सरकारला तसाच दारार दाखवावा, राज्यातील जो कांदा उत्पादक अडचणीत आला आहे. ती निर्णयात बंदी तातडीने उठवावी, दादांकडे अर्थखाते आहे, तर त्यांनी दूध उत्पादकांना दिलासा द्यावा, हीच आमची मागणी आहे. आम्हची जो मोर्चा आहे तो शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन काढत आहोत.”

- Advertisement -

हेही वाचा – Amol Kolhe यांचे Ajit Pawar यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणाले; ‘अजितदादा मोठे नेते…’

… म्हणून मी विरोधात बोलणार नाही

अजित पवारांच्या म्हणण्यानुसार तुम्ही खरेच राजनामा देण्यासाठी जाणार का?या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले, “बात निकली है तो दूर, यासंदर्भात मी त्यांच्या (अजित पवार) जेष्ठतेचा आणि नेतृत्वाचा मी कायम आदर करतोय. त्यामुळे त्यासंदर्भात भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. जेव्हा मला पहिल्याच वेळी दोन संसदरत्न मिळाला. जेव्हा शिव स्वराज्य यात्रा, विधानसभा निवडणुकीचा प्रचार यानंतर सर्व आमदार निवडून आल्यानंतर अजित पवारांची भाषणे ऐकली तर त्यांनी पाठीवर थाप देऊन शाब्बासकी दिली आहे. त्यामुळे त्यांनी एक विधान केले तर मी त्यांच्याविरोधात बोलणे योग्य ठरणार नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – Shalinitai Patil : अजितदादा येत्या 3 ते 4 महिन्यांत तुरुंगात दिसतील; शालिनीताईंचा मोठा दावा

खासगीतील चर्चा सार्वजनिक करणे योग्य ठरणार नाही

राजनाम्यासंदर्भात अमोल कोल्हे म्हणाले, एक संकेत हा कायम पाळला जावा. खासगीत जी चर्चा होते, ती सार्वजनिक करायची नसते. हा एक संकेत आहे. त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणताय, मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी खाजगीत काही चर्चा केली असेल आणि त्यांनी तर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने खासगीतील चर्चा सार्वजनिक करणे योग्य ठरणार नाही. शेवटी मी चार साडेचार वर्ष त्यांच्या (अजित पवार) यांच्या नेतृत्वा काम केली आहे. खासगीतील चर्चा सार्वजनिक करण्याची आवश्यकता नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -