घरमनोरंजनNagraj Manjule : नागराज मंजुळेंचं ओटीटी क्षेत्रात पदार्पण, पहिल्या वेब सिरीजची घोषणा

Nagraj Manjule : नागराज मंजुळेंचं ओटीटी क्षेत्रात पदार्पण, पहिल्या वेब सिरीजची घोषणा

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. आपल्या चित्रपटातून ते समाजाबद्दल, विषमतेबद्दल भाष्य करत असतात. याबरोबरच ते आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊ पाहत असतात. गेल्यावर्षी नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ 2’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. त्याआधी काही महिन्यांपूर्वी ते ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातही झळकले होते.

वेगळ्या धाटणीचे कथानक आणि दिग्दर्शनाचे कौशल्य यामुळे नागराज मंजुळेने सिनेसृष्टीवर छाप सोडली. आता नागराज वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. सध्याच्या काळात प्रेक्षकांचा मालिका आणि सिनेमांसोबतच वेब सिरीजकडे सुद्धा कल अधिक वाढला आहे. त्यातच नागराज मंजुळे यांनी आपल्या आगामी पहिल्या हिंदी वेब सिरीजची घोषणा केली. मटका किंग (Matka King web series) असे या वेब सिरीजचे नाव आहे. ‘प्राइम व्हिडीओ’ने (Amazon Prime Video) शेअर केलेल्या त्यांच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये नागराज यांच्या या आगामी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

- Advertisement -

 ही वेब सिरीज मटका किंग रतन खत्री यांच्या आयुष्यावर आधारित असून अभिनेता विजय वर्मा त्यांच्या भूमिकेत पाहायला मिळेल. रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर प्रॉडक्शनकडून निर्मिती करण्यात येत असून सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, अश्विनी सिडवानी, आशिष आर्यन हे निर्माते आहेत. तर, अभय कोरणे आणि नागराज मंजुळे यांनी लेखन केले आहे.

अभिनेता विजय वर्मा यात मुख्य भूमिकेत असणार आहे. मुंबईतील कापसाचा एक व्यापारी कशाप्रकारे मटका जुगाराचा व्यवसाय चालवतो आणि त्यातून कशाप्रकारे आपले साम्राज्य उभारतो ही वेब सीरिजची कथा आहे. मटका किंग रतन खत्रीच्या आयुष्यावर ही वेब सीरिज असल्याचे बोलले जात आहे. या वेब सीरिजमध्ये मुंबईतील 60-70  दशकातील चित्रण असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -