घरमहाराष्ट्र“आपल्या युतीतला संजय राऊत कोण?...”; नव्या जाहिरातीवरून नितेश राणेंचे मोठे वक्तव्य

“आपल्या युतीतला संजय राऊत कोण?…”; नव्या जाहिरातीवरून नितेश राणेंचे मोठे वक्तव्य

Subscribe

मुंबई : शिवसेनेच्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण थांबण्याचं नाव घेत नाही आहे. काल पहिल्या पानावर पंतप्रधान  नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे फोटो लावलेली जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून महाराष्ट्रातील शिवसेना आणि भाजपा युतीत नाराजीनाट्य सुरू झाले. कारण या जाहिरातीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना नापसंती दाखवत एकनाथ शिंदे यांना पसंती दिल्याची माहिती होती. काल राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर आज तीच जाहिरात दुरुस्त करून पुन्हा नव्याने छापण्यात आली आणि विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर विविध प्रतिक्रिया देत असताना भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. (“Who is Sanjay Raut in your alliance?…”; Nitesh Rane’s big statement on the new advertisement)

नितेश राणे म्हणाले की, भाजपा-शिवसेनेचे मागील एक वर्षापासून सरकार आहे आणि ते चांगले काम करत आहे. मात्र सध्या युतीत आग लावण्याचे काम कोण करत आहे. आपल्या युतीतला संजय राऊत कोण? युतीत कोण मिठाचा खडा टाकतोय? याचा आपण शोध घेतला पाहिजे. त्यामुळे युतीतील नेत्यांनी गाफिल न राहता, आपण सावध राहिले पाहिजे, असा इशारा नितेश राणे यांनी युतीतील सरकारला दिला.

- Advertisement -

भाजप-शिवसेनेत आलबेल नाही
संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, कालच्या जाहिरातीवरून आम्ही मत व्यक्त केले आहे. ठाणेकरांचे गुरूवर्य असणाऱ्या दिघेंचा, बाळासाहेबांचा जाहिरातीमध्ये फोटो नव्हता. त्यामुळे यावरून भाजपकडून बोलण्यात आल्याने विशेषतः फडणवीसांनी बोलल्यामुळे आज सर्वत्र नवीन जाहिरात झळकली आहे. पण पडद्यामागे काय घडलंय, हे मला माहीत आहे. एका वाक्यात सांगायचं तर काल जो काही हास्यास्पद प्रकार झाला, त्यामुळे त्यांच्यामध्ये काहीच आलबेल नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असे म्हणत राऊतांनी युती सरकारवर जोरदार टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -