घरमहाराष्ट्रनाशिक सकल मराठा समाजाने फुंकले रणशिंग

नाशिक सकल मराठा समाजाने फुंकले रणशिंग

Subscribe

राज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो नाशिककर जाणार रायगडावर

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी सरकारकडे दिलेल्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय व्हावा, तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारला दिलेल्या तिन्ही पर्यांयावर सकारात्मक पाऊल उचलावे, असे आवाहन नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाने केले आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी येत्या 6 जून रोजी जिल्ह्यातील हजारो समाजबांधव रायगडावर कूच करणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाची ऑनलाईन बैठक रविवारी (दि.30) पार पडली. शंभरहून अधिक समाजबांधव सहभागी झालेल्या या बैठकीत नाशिक जिल्ह्याने 6 जूनच्या आंदोलानाचे रणशिंग फुंकले असून जिल्हाभरातून हाजारो समाजबांधव रायगडावर नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा आणि शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने जमा होणार आहेत. येत्या दोन दिवसाच्या कालावधीत जनजागृती करून मराठा समाजाच्या घराघरात हा संदेश पोहचवून मिळेल, त्या साधनाने रायगडावर जाण्याची तयारी केली जाणार आहे.सोशल मीडियाचा वापर करून मराठा समन्वयक, समाजाची मानसिक तयारी करणार असून छञपतींचा आदेश अंतिम मानला जाणार असल्याचे या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.

- Advertisement -

वेळप्रसंगी पुन्हा एकदा गनिमी काव्याचा वापर करून रायगडावर पोहोचावे लागेल. त्यासाठी कोअर कमिटीची स्थापना करून झालेले निर्णय जिल्ह्यामध्ये पोहोचवण्यासाठी तालुकानिहाय ग्रुप तयार करून सोशल मीडियाद्वारे संपर्कात राहून प्रत्यक्षात एक ते दोन दिवसांमध्ये बैठक घेण्यात येणार आहे,अशी सुचना करण गायकर यांनी केली तर राजू देसले पोलीस व प्रशासन शंभर टक्के अडवणूक करणार आहे. या झूम बैठकीस करण गायकर, शिवाजी सहाणे, गणेश कदम , तुषार जगताप, राजू देसले, उमेश शिंदे, संतोष माळोदे, निलेश मोरे, योगेश कापसे, राम खुर्दळ, संजय फडोळ, संदीप शितोळे, विजय खर्जुल, आशिष हिरे, सुनील भोर, बंटी भागवत, योगेश पाटील, सुनिल गुंजाळ, शरद तुंगार, माधवी पाटील, पुजा धुमाळ, तुषार भोसले, योगेश गांगुर्डे, अमित नडगे, श्याम खांडबहाले, विजय पाटील, बाळासाहेब गीते, पंकज पाटील, ज्ञानेश्वर भोसले, मनोज जाधव, मदन गाडे यांसह समाजबांधव सहभागी झाले.

बुधवारी बैठक ६ जून रोजी

राज्याभिषेक सोहळा आणि मराठा समाजाचे संभाव्य आंदोलन याविषयी तपशीलवार नियोजन करून दिशा ठरविण्यासाठी बुधवार दि.२ जून रोजी वरद लक्ष्मी लान्स औरंगाबाद रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ मुख्य समन्वयकांनी या बैठकीला आवर्जून हजर रहावे असे आवाहन शिवाजी सहाणे व तुषार जगताप यांच्यासह आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -