घरमहाराष्ट्रSachin Ahir : भाजपाने सत्तेत असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?...

Sachin Ahir : भाजपाने सत्तेत असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? सचिन अहिर यांचा सवाल

Subscribe

मुंबई : मणिपूर येथून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप त्यांनी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर केला. यानंतर आज राहुल गांधी यांनी मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी पदयात्रा काढली. तसेच आज संध्याकाळी शिवाजी पार्क येथील मैदानावर इंडिया आघाडीची लोकसभा प्रचाराचा दृष्टीने पहिली सभा होणार आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर हे शिवाजी पार्कवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने सत्तेत असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Why BJP did not give Bharat Ratna to Veer Savarkar when he was in power Question by Sachin Ahir)

हेही वाचा – MLC Amsha Padvi : ज्या पक्षाकडे शिवसैनिक नाहीत, ती शिवसेना कशी? एकनाथ शिदेंचा सवाल

- Advertisement -

सचिन अहिर म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रेच्या माधम्यातून आम्ही हुकूमशाही विरोधात लोकशाही संकल्पनेवर बोलत आहोत. भारत जोडो न्याय यात्रेला राज्यातूनच नाही तर देशभरातून साथ मिळत आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून भारताला एकत्रित आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे नेते ज्यावेळी एकाच व्यासपीठावर असतील त्यावेळी आमची उपस्थिती आणि ताकद पण तेवढीच गरजेची आहे. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेला पाठबळ देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. आमच्यासाठी भारताला जोडण्याची गरज आहे, असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला.

जागावाटपासंदर्भात प्रश्न विचारल्यावर सचिन अहिर म्हणाले की, एक दोन दिवसांमध्ये काही घटक पक्षांचा समावेश करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक ते दोन जागाबद्दल अंतिम निर्णय होईल. वंचित बहुजन पक्ष महाविकास आघाडीत सामील झालीच पाहिजे ही आमची नाही तर त्या समाजाची अपेक्षा आहे, असे सचिन अहिर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – MLC Amsha Padvi : ज्या पक्षाकडे शिवसैनिक नाहीत, ती शिवसेना कशी? एकनाथ शिदेंचा सवाल

भाजपाने वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावकराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचपार्श्वभूमीवर भाजपा इंडिया आघाडीत असलेल्या ठाकरे गटावर अधूनमधून निशाणा साधत असते. आज मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हटले होते की, शिवतीर्थावर भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सावरकर स्मारकात घेऊन जावे, असं म्हटलं होते. आशिष शेलार यांच्या या टीकेला सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा जेव्हा सत्तेमध्ये होती तेव्हा त्यांनी वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही, असा सवाल सचिन अहिर यांनी विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -