घरताज्या घडामोडीशेतकर्‍यांना चांगला भाव मिळतो तेव्हा राहुल गांधी सभागत्याग का करतात?; डॉ. भारती...

शेतकर्‍यांना चांगला भाव मिळतो तेव्हा राहुल गांधी सभागत्याग का करतात?; डॉ. भारती पवारांचा सवाल

Subscribe

नाशिक : ज्यावेळी कांदा महागतो तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेच्या सभागृहात निषेध नोंदवत सभात्याग करतात टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले की, विरोधक महागाईच्या नावाने ओरडतात आम्ही तर शेतकर्‍यांची बाजू लावुन धरली असल्याचे सांगत केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. व्यापार्‍यांनी कांदा लिलाव सुरू करावे याकरीता आपण त्यांच्याशी चर्चा करणार असून याबाबत केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

केंद्र सरकारने कांदा निर्यातमुल्य वाढवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात कांद्याचा प्रश्न पेटला आहे. ठिकठिकाणी या निर्णयाविरोधात आंदोलन होत आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतांना २४१० रूपये प्रती क्विंटल असा दरही जाहीर केला आहे. डॉ. भारती पवार यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी डॉ. पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतांना सांगितले की, मागणी आणि पुरवठा याचा समतोल साधण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला.

- Advertisement -

नाशिक जिल्हयातील एकूण परिस्थितीबाबत केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांच्याशी मी गेल्या दोन तीन दिवसांपासून चर्चा करत होते. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नाशिक जिल्हयातील कांदा प्रश्न जाणून घेतला. त्यानूसार आता नाफेडमार्फत दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही नाफेडने ३५० कोटी रूपयांचा ३ लाख मेट्रीक टन कांदा खरेदी केला. नाफेड मार्फत उन्हाळ कांदा खरेदी करण्यात येत नव्हता मात्र आमच्या सरकारने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत सुमारे २५० कोटींचा उन्हाळ कांदा खरेदी केला. आता पुन्हा एकदा दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदा खरेदी करण्याचा देखील निर्णय घेतला जाईल. जिल्हयातील कांदा उत्पादकांना माझी विनंती आहे की, त्यांनी लिलाव सुरू करावेत. यासंदर्भात मी देखील त्यांच्याशी चर्चा करत आहे.

कांदा निर्यातमुल्य रदद करून उभे असलेले कांद्याचे कंटेनर पाठवावे अशी त्यांची मागणी आहे यासदंर्भात जिल्हाधिकार्‍यांनी नुकतीच बैठक घेतली. पियुष गोयल यांच्याशीही मी याबाबत चर्चा केली आहे. त्यानूसार जिल्हयातील किती व्यापार्‍यांचे कंटेनर शिपिंगसाठी उभे आहेत याची माहिती केंद्र सरकारने मागवली आहे. जिल्हाधिकार्‍यांमार्फत ही माहिती लवकरात लवकर पाठवण्यात येऊन त्याबाबत देखील सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन डॉ. पवार यांनी यावेळी दिले. केंद्राच्या या निर्णयाचा विरोधकांकडून निषेध व्यक्त होत असल्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, मी संसदेत नेहमी राहुल गांधींना निषेध करतांना बघितले. कांदा महागला की, राहुल गांधी सभागृहात निषेध करत सभात्याग करतात. त्यांना देखील हा प्रश्न विचारला पाहिजे. टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले की, विरोध महागाईच्या नावाने ओरडतात. मात्र दुसरीकडे शेतकरयांना दिशाभुल करण्याची वक्तव्य करतात मग शेतकर्‍यांच्या कांद्याला चांगला भाव मिळतो तेव्हा सभागृहात निषेध का नोंदवतात. आम्ही तर शेतकर्‍यांची बाजू लावून धरली आहे असे सांगत त्यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -