घरताज्या घडामोडीमुंबई ते सिंधुदुर्ग २५२० रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई २६२१, तिकीटात फरक...

मुंबई ते सिंधुदुर्ग २५२० रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई २६२१, तिकीटात फरक का?

Subscribe

मुंबई ते सिंधुदुर्ग आणि रिटर्न तिकीट हाऊसफुल्ल, तासाभरातच संपली ऑक्टोबरपर्यंतची तिकिटे

मुंबई ते सिंधुदुर्ग आणि रिटर्न या हवाई प्रवासाची तिकीट विक्री गुरुवारी सुरु केली आणि अवघ्या तासाभरातच २० ऑक्टोबरपर्यंतचे तिकीटाचे आरक्षण फुल्ल झाले आहे. ९ ऑक्टोपरपासून सिंधुदुर्गात हवाईसेवा सुरु होणार आहे. विमानाच्या तिकीटांचे आरक्षण सुरु केल्यावर तासाभरात तिकीटांची विक्री झाली खरी पण परतीच्या तिकीटामध्ये १०१ रुपये अधिक दर आकारल्यामुळे कोकणवासियांनी संताप व्यक्त केला आहे. जाताना खिसे गरम तेव्हा दर कमी आणि येताना खिसा थंड तेव्हा दर कमी असे का? तर जाताना आणि येतानाचे अंतर सारखेच असताना तिकीटाच्या दरात तफावत का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बहुप्रतिक्षित चिपी विमानतळावरुन विमान वाहतूक सुरु होत असल्यामुळे कोकणवासियांनी विमान प्रवास करुन गावी जाण्यासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद दाखवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील उपस्थित असणार आहेत. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. एअर इंडियाच्या ‘अलायन्स एअर’ या उपकंपनीमार्फत मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमान उडणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्गसाठी २५२० रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई परतीच्या प्रवासासाठी २६२१ रुपये तिकीट दर आहे. दररोज सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान दुपारी १ वाजता चिपी येथे उतरेल. तर परतीचा प्रवास दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी सुरु होईल आणि विमान २ वाजून ५० मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.

- Advertisement -

तिकीट शिल्लक नाही

सिंधुदुर्गाच्या विमानसेवेला कोकणवासियांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. एअर इंडियाने गुरावारी तिकीट विक्रिला सुरुवात केली, यानंतर तासाभरातच २० ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एअर इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

तिकीट दरावरुन कोकणवासियांचे प्रश्न

मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई असा प्रवास करताना जाताना – येताना अंतर सारखेच आहे. मग तिकीटाच्या दरात १०१ रुपयांचा फरक का? जाताना विमानाचा दर कमी ठेवला आहे तर येताना दर जास्त ठेवल्यामुळे येताना आमच्या समानावर जास्तीचा दर आकारला का? असाही प्रश्न करण्यात आला आहे. जास्तीचा दर हा कोकणवासियांकडून वर्गणी गोळा करताय का? असा मजेदार प्रश्नही विचारण्यात आला आहे. तिकीट दरावरुन संतापलेल्या कोकणवासियांकडून प्रशांची कविता करण्यात आली आहे. यामध्ये गावावरुन येताना सोला , आगुळ , नाल , तवशी , चिबुड घेऊन येणार त्याचे लगेजचे पैसे अधिच तुम्ही आकारलेत का ? असेही प्रश्न विचारण्यात आले आहेत.

- Advertisement -

मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई विमान प्रवासाच्या तिकीट दरावरुन मालवणी कविता सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ती खालीलप्रमाणे आहे.

इमानाचा तिकिट

मुंबैतसून शिंधुदुर्ग – २५२०
शिंधुदुर्गातसून मुंबै – २६२१
फरक – १०१

माल्वणी माणसाक पडलेले प्रश्न

यताना जाताना अंतर तितक्याच मगे तिकिटीत १०१ चो फरक कसो ?

जाताना १०१ जास्त घेतालात म्हणजे आमच्या घराकडे थांबतलात काय ?

मुंबैतसून येताना किसो गरम तेवा तुमचो दर कमी जाताना किसो थंड तेवा दर जास्त कशाक ?

यताना दर कमी भायरचे यतले त्यांचा फावतला
आम्ही जातलव तुमचो दर जास्त आमी मरतलव .

जाताना सोला , आगुळ , नाल , तवशी , चिबुड नेतलव त्याचा लगेज आधीच लावलात काय ?

१०१ जादा घेतालात ती कशाची वर्गणी आसा काय ?

बरा ही वर्गणी आसली तर कशाची आणि पावती देतालात काय ?

बरा समजा यवचा तिकिट ताबडतोब काढलव तर १०१ कमी होतले ?

जाताना १०१ जास्त घेतालात त्याच्या बद्दल वाटेत काय पेज पाणी ?

बरा दरवाजात उभे रवान गेलव तर काय कमी करतालात ?

याक सांगा ही १०१ ची फोडणी आमकाच कशाक ?

बरा बारक्या पोरांका घेतलव तर काय कमी होतले ?

मेले लुटूक उठले बाकी काय ?


हेही वाचा : Mumbai-Sindhudurg flight : मुंबई- सिंधुदुर्ग विमान प्रवास फक्त २५०० रुपयांत, वाचा फ्लाईटचे वेळापत्रक


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -