घरमहाराष्ट्रप्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून

प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून

Subscribe

प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने विष देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी प्रियकर आणि प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. शीतल संजय भोसले आणि योगेश कदम, अशी आरोपींची नावे आहेत. तर संजय भोसले असे खून करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. ते भारतीय लष्करात कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शीतल आणि योगेशचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होते. योगेश हा शीतल यांच्या घराच्या समोरच राहत असे. प्रेम प्रकरणात पती संजय हे अडथळा ठरत होते. ते भारतीय लष्करात कार्यरत असल्याने कमीत कमी घरी यायचे. त्यामुळे यांचो प्रेमप्रकरण सुरूच होते. दरम्यान, संजय यांना पत्नी शीतल आणि योगेश यांचे प्रेम प्रकरण माहीत झाले. यावरून पत्नी शीतल आणि मृत झालेले संजय यांच्यात अनेकदा वादही झाले. त्यामुळे संजय हे दुसरीकडे भाड्याने राहण्यास गेले. परंतु, तिथे ही संजय हे नोकरीसाठी आसाम येथे गेले असता त्यांच्या पाठीमागे हे दोघे भेटतच होते.

- Advertisement -

आपल्या प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढायचा, असे पत्नी शीतल आणि योगेशने ठरवले होते. या महिन्यात संजय सुट्टीवर घरी आले. याच दरम्यान रासायनिक कंपनीत कामाला असलेल्या योगेशने सोडिअम साइनाइड शीतलला आणून दिले. ते अत्यंत घातक आणि विषारी आहे. रात्री संजय यांना पत्नी शीतलने पाण्यातून विषारी सोडिअम साइनाइड दिले. संजय यांचा जागीच मृत्यू झाला. प्रियकर योगेश याला बोलवून घेत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरले. योगेशने प्रियसीसह मित्राच्या मदतीने त्यांचा मृतदेह मोटारीत घालून राजगड पोलिसांच्या हद्दीत बेवारस फेकून दिला. परंतु, दुसऱ्याच दिवशी तो मृतदेह राजगड पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्या खिशात मोबाईल सापडला यावरून ते लष्करात असून पत्नीशी संपर्क केला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. दरम्यान, पत्नी शीतलला उलट-सुलट प्रश्न केले असता त्यांनीच प्रियकर योगेशच्या मदतीने पती संजय यांचा खून केल्याची कबुली दिली. मृत संजय आणि पत्नी शीतल यांना दहा, आठ वर्षीय मुलगा आणि मुलगी आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ बाबर हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -