घरमहाराष्ट्रसत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? फडणवीस म्हणाले, युवानेता म्हणून...

सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? फडणवीस म्हणाले, युवानेता म्हणून…

Subscribe

Devendra Fadnavis on Satyajeet Tambe | नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आम्ही राजेंद्र विखे पाटील यांचा विचार करत होतो. त्यासंदर्भात चर्चाही सुरू होती. परंतु, काही कारणाने त्यांनी असमर्थता दाखवली. पण त्यांना उमेदवारी द्यायची होती.

Devendra Fadnavis on Satyajeet Tambe | पुणे – काँग्रेसने सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा पाठिंबा काढून घेतल्याने भाजपाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय आम्ही करू. सत्यजित तांबे नेता, युवानेता म्हणून त्यांचं काम चांगलं आहे. पण, राजकीय निर्णय धोरणांप्रमाणे करावे लागतात. योग्यवेळी करावे लागतात, बावनकुळे याबाबत योग्य निर्णय करतील.

- Advertisement -

हेही वाचा – देवेंद्रजी, सत्यजित तांबेना पाठींबा देणार ना?, सोशल मीडियावर तो फोटो तुफान व्हायरल

दरम्यान, हा भाजपाचा प्लान होता असं म्हटलं जातंय. कारण या मतदारसंघासाठी भाजापने एकही उमेदवार जाहीर केला नाही. यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आम्ही राजेंद्र विखे पाटील यांचा विचार करत होतो. त्यासंदर्भात चर्चाही सुरू होती. परंतु, काही कारणाने त्यांनी असमर्थता दाखवली. पण त्यांना उमेदवारी द्यायची होती.

- Advertisement -

हेही वाचा – सत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, नाना पटोलेंचं मोठं विधान

नेमकं प्रकरण काय?

विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी नाशिकमधून काँग्रेसने डॉ.सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, सुधीर तांबे यांनी उमेदवारी नाकारली. त्याजागी त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते काँग्रेसमधून उमेदवारी भरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र, सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबाबत आम्हाला माहित नव्हतं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. त्यामुळे सत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आली.

दरम्यान, सत्यजित तांबेंनी पाठिंबा मागितल्यास आम्ही पाठिंबा देण्याचा विचार करू असं, भाजपा प्रदेशाध्यक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनीही याआधीच सत्यजित तांबेंच्या भाजपा प्रवेशाबाबत संकेत दिले होते. त्यामुळे सत्यजित तांबे या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाजवळ जाण्याची शक्यता आहे.

मनातील मांडे

पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. त्यामुळे मातोश्रींचं द्वार त्यांच्यासाठी उघडे ठेवलं असलं तरीही त्या जाणार नाहीत. पंकजा मुंडेंसाठी भाजप हेच त्यांचं घर. त्यामुळे मनातील मांडे मनातच राहणारच, असंही फडणवीस म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -