घरमहाराष्ट्रनितेश राणेंचा आमदारकीचा राजीनामा; नाराज सतीश सावंत आव्हान देणार?

नितेश राणेंचा आमदारकीचा राजीनामा; नाराज सतीश सावंत आव्हान देणार?

Subscribe

हरिभाऊ बागडे यांनी नितेश राणे यांचा राजीनामा स्विकारला. दरम्यान नाराज सतीश सावंत यांनी नितेश राणे यांना आव्हान देण्याचे ठरवले आहे.

कणकवली-देवगड विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी आज आमदार पदाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे खाजगी सचिव राजकुमार सागर यांच्याकडे त्यांनी आज राजीनामा सुपूर्द केला. हरिभाऊ बागडे यांनी नितेश राणे यांचा राजीनामा स्विकारला. दरम्यान युतीची घोषणा झाल्यानंतर भाजपला कोकणात कणकवली-देवगड हा एकमेव मतदारसंघ मिळाला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना या मतदारसंघात भाजपाचे तिकीट मिळू शकते. असे असताना दुसरीकडे नारायण राणे यांचे खंदे पुरस्कर्ते सतीश सावंत यांनी नितेश राणे यांच्यावर सापत्नपणाची वागणूक दिल्याचा आरोप करत स्वाभिमान संघटनेचा राजीनामा दिला. त्यामुळे सतीश सावंत यांनी नितेश राणे यांना आव्हान देण्याचे ठरवले आहे.

प्रमोद जठार यांची माघार

कणकवली-देवगड विधानसभा मतदार संघासाठी भाजपाकडून माजी आमदार प्रमोद जठार यांना दावेदार मानण्यात येत होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद जठार या जागेसाठी इच्छुक नसल्याचे समजते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रमोद जठार यांची नुकतीच भेट घेतली होती. विशेष म्हणजे २०१४च्या निवडणूकीत नितेश राणे यांनी प्रमोद जठार यांचा पराभव केला होता.

- Advertisement -

सतीश सावंत आव्हान देणार?

नितेश राणे यांच्यावर नाराज असलेल्या सतीश सावंत यांनी नुकताच स्वाभिमान संघटनेचा राजीनामा दिला. त्यानंतर ते आता शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सतीश सावंत लवकरच आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -