घरमहाराष्ट्रभारत जोडो यात्रेत सहभागी होणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का? उद्धव ठाकरे म्हणाले…

Subscribe

मुंबई – राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. देगलुर येथे ही यात्रा येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक नेते सहभागी होणार आहेत. तसंच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सहभागी होतील का असं प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी याबाबत अद्याप काही ठरलं नसल्याचं सांगतिलं. ऋतुजा लटके यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ठाकरे बोलत होते.

हेही वाचा – भारत जोडो यात्रेच्या धसक्यानेच चंद्रशेखर बावनकुळेंची झोप उडाली, नाना पटोलेंचा टोला

- Advertisement -

गेल्या महिन्याभरापासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आयोजित करण्यात आली आहे. विविध राज्यात ही यात्रा गेली असून तिथून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रात ही यात्रा उद्या दाखल होणार असून देगलुर येथून महाराष्ट्रातील यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहेत. तसंच, महाविकास आघाडीचे नेतेही या यात्रेत सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असल्याने त्यांची यात्रेत जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीतील इतर नेते या यात्रेत सहभागी होतील. तर, उद्धव ठाकरे या यात्रेत जातील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, याबाबत उद्धव ठाकरे यांनी अद्यापही काहीही ठरवलेलं नाही. परंतु, शिवसेनेतेली अनेक नेते भारत जोडो यात्रेत सामील होतील, असं उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘भारत जोडो यात्रे’चे नांदेड प्रभारी काँग्रेस नेते नसीम खान यांच्या गाडीचा अपघात

काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेले माजी केंद्रीय मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये शनिवारी अपघात झाला. नांदेडच्या भिलोली टोलनाक्यावर हा अपघात झाला. नसीम खान हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी हैदराबादहून नांदेडच्या दिशेने जात होते. त्यावेळी नसीम खान यांच्या गाडीला अपघात झाल्याचे समजते. या अपघातात नसीम खान यांच्या पायाला दुखापत झाल्याचे समजते. मात्र ही दुखापत किरकोळ असून, ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

असा असेल मुक्काम

दि. ७ नोव्हेंबर २०२२

• सायं ७.३० वा.: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर परिषद शेजारी, देगलूर येथे आगमन व स्वागत

• रात्री ९.०० वा.: पदयात्रा प्रारंभ वन्नाळीकडे प्रयाण

• रात्री ११.०० वा.: गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी, वन्नाळी येथे आगमन
गुरुनानक देवजी गुरुपुरब अरदास

• कार्यक्रमानंतर देगलूरकडे प्रयाण व रात्रीचा मुक्काम

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -