घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : देशाचे भवितव्य घडविण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा; अंबादास दानवेंचे विद्यार्थ्यांना...

Winter Session : देशाचे भवितव्य घडविण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा; अंबादास दानवेंचे विद्यार्थ्यांना आवाहन

Subscribe

नागपुर : देशाचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी आपल्या सारख्या तरुणांवर आहे. फक्त भाषण करण्यापुरते सीमांत अभ्यास न करता संपूर्ण संसदीय प्रणाली समजून घ्या. ही महान संसदीय परंपरा जपण्यासाठी मतदान करणे खूप आवश्यक असून मतदानाचा अधिकार निभावणे पवित्र काम आहे. ते आवर्जून तुम्ही पार पाडा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विद्यार्थ्यांना केले. (Winter Session Exercise the right to vote to shape the future of the country Ambadas Danve appeals to students)

हेही वाचा – Winter Session : ‘तुम्ही शिक्षक आहात, मात्र विद्यार्थ्यांपेक्षाही बेशिस्त झालात’; उपसभातींनी आमदाराला सुनावले

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक व न्यायमूर्ती रानडे यासारख्या महान विभूती या महाराष्ट्र विधिमंडळ सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. देशाला या सदस्यांनी दिशा दिली आहे. त्यांनी दिलेली सदभावनेची परंपरा जपा, असा सल्ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अभ्यास वर्गासाठी विधिमंडळ सभागृहाच्या भेटीवर आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत होते.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : मला फार बोलायला लावू नका अंगलट येईल; काँग्रेस आमदाराच्या प्रश्नावर अजितदादा भडकले

राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात उत्तम समन्वय आहे. सभेच्या सभागृहात असलेल्या प्रत्येक सदस्यांनी आमच्या भावनांचा आदर केला असून हाच समजुतदारपणा भारतीय लोकशाहीचा आत्मा असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यांनी असेही म्हटले की, संसदीय लोकशाहीत कोणत्याही पक्षातील सदस्य शत्रु नसून पक्षाच्या विचाराप्रमाणे त्यांनी कार्य करावे, अशी माझी धारणा आहे. राज्याच्या विधिमंडळाचे कामकाज देशभरात उच्च स्थानावर असून भिन्न पक्षातील सदस्य सुद्धा येथे एकाच व्यासपीठावर कामानिमित्त एकत्र येतात हे या सभागृहाचे वैशिष्ट्य असल्याचे दानवे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -