घरआतल्या बातम्यानव्या जिल्हाधिकारी-आयुक्तांच्या नियुक्तीने असे झाले 'आजी-माजी' पालकमंत्र्यांचे समाधान

नव्या जिल्हाधिकारी-आयुक्तांच्या नियुक्तीने असे झाले ‘आजी-माजी’ पालकमंत्र्यांचे समाधान

Subscribe

नाशिक : आगामी महापालिका, लोकसभा अन् विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, जिल्हाधिकारी आणि आयुक्तपदी आपल्याच मर्जीतील अधिकारी असावेत, यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू होते. त्यासाठी आजी – माजी पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने दोन महिने याबाबतचा निर्णय होऊ शकला नाही. अखेर या दोनही महत्वाच्या पदांची वाटाघाटी होऊन आयुक्तपदी पालकमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय डॉ. अशोक करंजकर यांची तर जिल्हाधिकारी पदी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय जलज शर्मा यांची वर्णी लावण्यात आली.

जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झालेले जलज शर्मा आणि त्यांची पत्नी मनीषा खत्री हे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या गुडबुकमध्ये असल्याने हे दोघेच अनुक्रमे जिल्हाधिकारी आणि नाशिक महापालिका आयुक्तपदी येतील, असा कयास लावला जात होता. त्यातील जलज शर्मांना अपेक्षीत पद देण्यात महाजन यशस्वी ठरले. मात्र पालकमंत्री भुसे हे नाराज होऊ नये म्हणून त्यांच्या मर्जीतील म्हणजेच डॉ. अशोक करंजकर यांना महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले.

- Advertisement -

प्रामुख्याने डॉ. अशोक करंजकर यांच्यासह नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ रघुनाथ गावडे, फिल्मसिटीचे संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आदींच्या नावांची महापालिकेच्या आयुक्तपदासाठी चर्चा होती. मात्र डॉ. करंजकर यांच्या नावावर भुसेंच्या आग्रहास्तव शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

हेही वाचा : अखेर नाशिकला लाभले नवे जिल्हाधिकारी अन् महापालिकेला आयुक्त; ‘यांची’ नियुक्ती

- Advertisement -
  • कोण आहेत जलज शर्मा?

जलज शर्मा हे चंदिगड येथील असून त्यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१४ च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी जळगाव येथे उपविभागीत अधिकारी,यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नागपूर महागरपालिका अतिरिक्त आयुक्त पदांवर काम केले असून सध्या ते धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

  • कोण आहेत अशोक करंजकर?

अशोक नागुराव करंजकर हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००९ च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. आजवर ते राज्य कामगार विमा योजनेचे (मुंबई) आयुक्त म्हणून कामकाज करीत होते. सुमारे ११ वर्षांपूर्वी ते धुळ्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम बघत होते. या काळात त्यांच्याकडे धुळे महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचाही कार्यभार आला होता. महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्री डेव्हलमेंट कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -