घरमहाराष्ट्रमहिला बचत गटाचं 'महा सोनखत' निर्मिती प्रकल्प

महिला बचत गटाचं ‘महा सोनखत’ निर्मिती प्रकल्प

Subscribe

महिला बचत गटांना रोजगार निर्मिती व्हावी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अल्प दरात सोनखत उपलब्ध व्हावे यासाठी इंद्रायणी फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेडने 'महा सोनखत' या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या सोनखतामुळे महिलांना रोजगार मिळणार असून त्यासोबतच चांगले उत्पन्न देखील मिळणार आहे.

ग्रामीण भागातील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महिला बचत गटांनी सोनखत निर्मितीचा प्रयोग केला आहे. त्याचबरोबर नापीक होत चाललेली जमीन पुन्हा नव्याने सुपीक करण्यासाठी खेड तालुक्यांमध्ये महिला बचत गटांमार्फत सोनखत निर्मिती करण्यात आली असून हा प्रकल्प देशात पहिला प्रकल्प म्हणून पाहिला जात आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महिला बचत गटांना महिंद्रा कंपनीमार्फत १ लाख रुपयांचे भांडवल देण्यात आले आहे. खेड तालुक्यातील आदिवासी भागातील मंरोशी येथील महिला बचत गटामार्फत सोनखत निर्मितीचा प्रकल्प उभा राहणार असल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पामुळे महिला बचत गटांना चांगल्या पद्धतीने उत्पन्न देखील मिळणार आहे.

सोनखतातून येणारे उत्पन्न सर्वात अधिक

खेड तालुक्यात तीन मोठी धरणे झाली असल्याने या भागातील जमीन नापीक होत चालली आहे. त्यासोबत रासायनिक खतांचा वापर ही वाढल्यामुळे शेत पिकांचा दर्जा देखील ढासळत चालला आहे. ढासळत चालेल्या उत्पन्नाचा विचार करुन सोनखताच्या प्रकल्पाचा विचार करण्यात आला आहे. चांगल्या उत्पन्नासाठी सोनखताचा योग्य पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाचे प्रात्यक्षिक राजगुरुनगर येथील देशातील एकमेव असलेल्या कांदा आणि लसूण संशोधन केंद्रात घेण्यात आले होते. त्यामध्ये कांद्याची पिक तीन वेगवेगळ्या प्रकारात घेण्यात आले होते. त्यातून सोनखतातून येणारे उत्पन्न हे जास्त प्रमाणात मिळणार असल्याचे सोनाखत प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात जाहिर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला यावेळी विभागिय आयुक्त दिपक म्हैसकर, प्रांताधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश गोरे, गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार, सुलभ इंटरनँशन दिल्लीचे पद्मभुषण बिंदेश्वर पाठक यांच्यासह महिला बचत गटांतील आदी महिला उपस्थित होत्या.

- Advertisement -

महिला बचत गटांना रोजगार निर्मिती व्हावी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अल्प दरात सोनखत उपलब्ध व्हावे यासाठी इंद्रायणी फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेडने ‘महा सोनखत’ या कंपनीची स्थापना केली आहे. या महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन योग्य सोनखत उत्पादनाला सुरुवात केली आहे. या खताची किंमत प्रति किलो २० रुपये याप्रमाणे ठेवण्यात आली आहे. इतर खतांच्या तुलनेत ही किंमत अल्प आहे.

देश महात्मा गांधीच्या विचाराने प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. महात्मा गांधीजीच्या विचारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलभ शौचालयांचे ‘स्वच्छ भारत मिशन’ राबवून खऱ्या अर्थाने गांधीजीच्या विचारांची चळवळ पुढे नेण्यात यशस्वी ठरताना पहावयास मिळत आहे. या शौचालयातून मिळणारे सोनखत महिला बचत गटांमार्फत यशस्वीरित्या तयार होत असल्याने शेतजमिनीला पूरक आणि पोषक आहे. त्यातून चांगले उत्पादन मिळणार असून या सोन खताचा यशस्वी प्रयोग राबविला जाईल अशी अपेक्षा आहे.  – दिपक म्हैसकर, विभागीय आयुक्त पुणे

- Advertisement -

महिला बचत गटांना रोजगार मिळावा यासाठी हा प्रकल्प तयाक करण्यात आला आहे. यामुळे अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासोबत चांगले उत्पन्न देखील मिळणार आहे.  – आयुष प्रसाद , उपजिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -