घरताज्या घडामोडीसोनिया गांधींना हात लावला तर.., यशोमती ठाकूर यांचा भाजपला इशारा

सोनिया गांधींना हात लावला तर.., यशोमती ठाकूर यांचा भाजपला इशारा

Subscribe

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडी चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठिशी लागला आहे. काल(मंगळवार) त्यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर राज्यासह देशातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते तीव्र आंदोलनं करत आहेत. केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणण्याच्या भावनेने आणि सूडबुद्धीने ही कारवाई सुरू आहे. दरम्यान, सोनिया गांधींना हात लावला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

सोनिया गांधींना त्रास का देताय?, काय कारण आहे. हे आता कोणी खपून घेणार नाही. सोनिया गांधींना हात लावला तर देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल. आम्ही शांत बसणार नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

- Advertisement -

राजधानी दिल्लीत सध्या संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून बराच गदारोळ झाला आहे. चार खासदारांचं निलंबनही करण्यात आलं आहे. काल काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील आक्रमक झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे ईडी चौकशीवरून संसदेतील राजकारणही बरचं तापलं आहे.

जीएसटी, महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना या मुद्द्यांवर काँग्रेस व सहयोगी पक्ष संसदेत आवाज उठवू पाहत आहेत म्हणून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी खोट्या प्रकरण उकरून काढत सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सोनिया गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी ईडीने चौकशीला बोलावल्यामुळे राज्यभर आजही सत्याग्रह करून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा : नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ५०,००० रुपये इन्सेन्टिव्ह; मुख्यमंत्र्यांची घोषणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -