घरमहाराष्ट्रयवतमाळ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ७ महिन्यांपासून १० व्हेंटिलेटर धुळखात पडून

यवतमाळ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ७ महिन्यांपासून १० व्हेंटिलेटर धुळखात पडून

Subscribe

राज्यात एकीकडे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच वेळीवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. असे असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दहा व्हेंटिलेटर गेली सात महिने धूळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबबतचे पत्र पुसद येथील काँग्रेस नगरसेवक साकीब शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पुसद उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असतानाही व्हेंटिलेटर धूळखात पडून असल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान निधीतून पुसद उपजिल्हा रुग्णालयाला सात महिन्यापूर्वी दहा व्हेंटिलेटर आणि ब्लड स्टोरेज सिस्टीम उपलब्ध करुन देण्यात आली होती.

दरम्यान जिल्ह्यात व्हेंटिलेटर अभावी अनेक कोरोनाबधित रुग्णांना आपला जीव गमावावा लागत आहे. अशाच जीव वाचवणाऱ्या यंत्रणा जर धूळखात पडून असतील तर त्याचा काय उपयोग त्यामुळे या धूळखात पडलेल्या यंत्रणा तात्काळ उपयोगात आणाव्या अशी मागणी पुसदचे नगरसेवक साकीब शहा यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना इमेलद्वारे केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्राद्वारे व्हेंटिलेटर सुरु करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -
yavatmal district hospital has not used 10 ventilators for 7 months
यवतमाळ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ७ महिन्यांपासून १० व्हेंटिलेटर धुळखात पडून

पुसद उपजिल्हा सामान्य रुग्णालयाला सप्टेंबर २०२० मध्ये १० व्हेंटिलेटर प्राप्त झाले मात्र व्हेंटिलेटर हाताळण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्ती आणि डॉक्टर नसल्याने त्या व्हेंटिलेटरचे इन्स्टॉलेशन झाले नाही. अशी माहिती पुसद उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. हरिभाऊ फुफाटे यांनी दिली आहे.दरम्यान १० व्हेंटलेटरपैकी ५ व्हेंटिलेटर आता यवतमाळ जिल्हा रुग्णालयासाठी मागवण्यात आल्या आहे. परंतु एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना व्हेंटिलेटर धुळखात पडून असल्याची गंभीर आहे. दरम्यान पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांनी नुकतीच उपजिल्हा रुग्णालयात पाहणी केली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -