घरदेश-विदेशCovid-19: हाँगकाँगने भारतातून येणार्‍या फ्लाईट्सला ३ मे पर्यंत घातली बंदी

Covid-19: हाँगकाँगने भारतातून येणार्‍या फ्लाईट्सला ३ मे पर्यंत घातली बंदी

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना हाँगकाँगने विमानसेवेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. हाँगकाँगने मंगळवारपासून पुढच्या तीन मेपर्यंत भारतातून येणाऱ्या सर्व उड्डाणांना बंदी घातली आहे. रविवारी ही घोषणा करण्यात आली असून भारतात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हाँगकाँगने हे पाऊल उचलले आहे. यासह पाकिस्तान आणि फिलिपाईन्सच्या विमानसेवेलाही अधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. एप्रिलमहिन्यात विस्तारा एयरलाईन्स मधून प्रवास करणाऱ्या साधारण ५० प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच हाँगकाँग सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हाँगकाँगच्या नियमांनुसार सर्व प्रवाशांना तेथे प्रवेश करण्यापूर्वी जास्तीत जास्त ७२ तासांपूर्वी आरटी-पीसीआर टेस्ट करून कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह दाखणं बंधनकारक आहे. यापूर्वी रविवारी हाँगकाँग सरकारने मुंबईहून हाँगकाँगदरम्यान असणाऱ्या उड्डाण सेवा देणाऱ्या विस्तारा TATA SIA Airlines (Vistara) एअरलाईन्सच्या सर्व उड्डाणांना २ मे पर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी विस्तारा एअर लाईन्सच्या मुंबई-हाँगकाँग या उड्डाणातून हाँगकाँगला आलेल्या ३ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच निर्णय घेतला होता.

- Advertisement -

दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच हाँगकाँगमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती, त्यानंतर शहरातील हजारो लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु, सध्या हाँगकाँगमध्ये कोरोना संसर्गाचा स्थानिक प्रसार झाल्याचे समोर आले नाही. तर दुसरीकडे, भारतात कोरोनाने कहर केले आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. देशात गेल्या २४ तासांत अडीच लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली असून मृत्यूदर देखील मोठ्या संख्येने वाढला आहे.

देशांत गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही आकडेवारी अक्षरश: धडकी भरवणारी आहे. तर देशात गेल्या २४ तासांत १ लाख ३८ हजार ४२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशांत आतापर्यंत १ कोटी ४७ लाख ८८ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या देशात १८ लाख १ हजार ३१६ सक्रिय रूग्ण आहेत. तर आतापर्यंत १ कोटी २८ लाख ९ हजार ६४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


Covid-19: दिल्लीसह ‘या’ ६ राज्यांतून महाराष्ट्रात एन्ट्री करणाऱ्यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -