घरक्राइमपोलीस भरतीचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटनेने खळबळ

पोलीस भरतीचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटनेने खळबळ

Subscribe

पोलीस भरतीचे आमिष दाखवत एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात ही घटना घडली असून या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पोलीस भरतीचे आमिष दाखवत एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात ही घटना घडली असून या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्येचे माहेरघर म्हटले जाणाऱ्या पुण्यात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तक्रार एका 31 वर्षीय तरुणीकडून करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असल्याचे सांगण्यात आले आहे. (Young girl raped by luring police recruitment in Pune)

हेही वाचा – नाशिक, सोलापूरनंतर संभाजीनगर आणि पालघरमध्ये ड्रग्जचा साठा जप्त; नेमका कोणाचा हात?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 31 वर्षीय तरुणीची एका संस्थेत आरोपी अक्षय चंद्रशेखर प्रधान (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) याच्याशी ओळख झाली होती. यानंतर अक्षयने तो राजपत्रित अधिकारी असल्याची बतावणी पीडित तरुणीला केली. ज्यानंतर या आरोपीने पीडितेला पोलिसात भरती करण्याचे आमिष दाखवले. यानंतर अक्षयने त्या तरुणीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या या कृत्याला तिने विरोध केला असता, त्याने तिला धमकावले.

आरोपी अक्षय प्रधान हा इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेवर बलात्कार केला. एवढेच नाही तर तिची बदनामी करण्याची धमकी देत त्याने तिच्याकडून 1 लाख 30 हजार रुपये देखील लुबाडले. दरम्यान, आरोपीने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अन्य उमेदवारांकडून पैसे उकळल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस चालवणाऱ्या रेल्वे पोलिसानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात रेल्वे पोलिसात कार्यरत पोलीस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात पॉक्सो व विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -