घरमहाराष्ट्र''आय लव्ह यू...''म्हणत एसटी बस स्थानकात तरुणाची आत्महत्या

”आय लव्ह यू…”म्हणत एसटी बस स्थानकात तरुणाची आत्महत्या

Subscribe

एसटी बस स्थानकाच्या शेडमध्ये एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव येथील एसटी बस स्थानकामध्ये युवकानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली.

एसटी बस स्थानकाच्या शेडमध्ये एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव येथील एसटी बस स्थानकामध्ये युवकानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. तसंच, संबंधित युवकानं आत्महत्येपूर्वी जमिनीवर एका मुलीच्या नावे निरोप देखील लिहला आहे. त्यामुळं या युवकानं प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

धडगाव येथील एसटी बस स्थानकात शुक्रवारी रात्री प्रवासी शेडमध्ये आत्महत्या केली. बस स्थानकाच्या शेडमधील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माहिती मिळताच धडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अद्याप या तरुणाची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

आत्महत्येपुर्वी बसस्थानकातील फरशीवर या युवकाने आत्महत्येपूर्वी खडूने एक नोट लिहिली आहे. ”मी एका मुलीशी प्रेम करतो आणि प्रेम प्रकरणात धोका मिळाला आहे. दोन दिवस मी उपाशी राहिलो. फक्त पाणी प्यायलो”, असे त्यानं लिहिलं आहे.

- Advertisement -

या प्रकरणाचा तपास केला असता प्रथम दर्शनी तरूणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ओळख पटल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे. याबाबत धडगाव पोलिस अधिक तपास करत आहे. संबंधित तरुणाबद्दल अधिक माहिती असल्यास धडगाव पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – Russia Ukraine War: बापरे! आता रशियाने नॉर्थ अटलांटिक समुद्रात उतरवल्या आण्विक पाणबुड्या

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -