घरमहाराष्ट्रभिमाशंकरला पाण्यात बुडून उच्च शिक्षित तरुणाचा मृत्यू

भिमाशंकरला पाण्यात बुडून उच्च शिक्षित तरुणाचा मृत्यू

Subscribe

भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळच्या जवळ असलेल्या धबधब्यावर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुणवंत दत्तात्रय पाटील (वय २४) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा नंदुरबार येथील रहिवासी असून कल्याणी टेक्नो फोर्स कन्हेरसर येथे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत होता. भिमाशंकर परिसराला निसर्गाचे स्वर्ग म्हणून पाहिलं जातं. विकेंडचा आनंद साजरा करण्यासाठी या परिसरात तरुणाई मोठ्या संख्येने येत असते. अशावेळी धोकादायक परिसरात जाताना सावध रहायला पाहिजे, मात्र सध्याची तरुणाई त्याकडे सहज दुर्लक्ष करत असते त्यामुळे अपघाती घटना घडत आहेत.

कसा झाला अपघात

कंपनीला सुट्टी असल्याने कंपनीमधील निखील जगताप, अक्षय जाधव, मयुर पवार, दत्ता जाधव, नितीन झिने, नितीन गोरे, अरविंद बोंबे, अक्षय ढेरंगे, सचिन पाटील आणि गुणवंत पाटील हे सर्वजन मित्र दुचाकीवरुन सकाळी भिमाशंकरला दर्शनासाठी निघाले. भीमाशंकरच्या अलीकडे दोन किलोमीटर कोंढवळ फाटा येथे त्यांनी कोंढवळ धबधब्याचा फलक पाहिला आणि त्यांना धबधब्यांच्या मोह आवरला नाही. सर्व जण पाण्यात उरतले. पाण्याबाहेर आल्यानंतर गुणवंत गायब असल्याचे इतरांच्या लक्षात आले. सर्व मित्रांनी पाण्यात उडया मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा तपास लागला नाही.

- Advertisement -

दरम्यान कोंढवळ ग्रामस्थांच्या मदतीने गुणवंतचा शोध सुरु केला. त्यानंतर त्याला पाण्यातून शोधून बाहेर काढले आणि तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -