घरमहाराष्ट्रYugendra Pawar : आजोबा सांगतील तेच धोरण म्हणणारे युगेंद्र पवार आहेत कोण...

Yugendra Pawar : आजोबा सांगतील तेच धोरण म्हणणारे युगेंद्र पवार आहेत कोण ? 

Subscribe

युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत. शरयू Agro चे ते सीईओ आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत.

मुंबई : राज्यातील राजकारणात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक नव्हे तर अनेक राजकीय धक्के महाराष्ट्रातील जनतेने अनूभवले. त्याच राज्यातील राजकारणात अजूनही राजकीय उलथापालथी कमी होताना दिसत नाहीत. पुतणे अजित पवारांनी काका शरद पवारांविरुद्ध भूमिका घेत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. असे असतानाच आता त्याच अजित पवारांना त्यांचेच पुतणे युगेंद्र पवारांनी धक्का दिला आहे. आजोबा (शरद पवार) सांगतील तेच धोरण असे म्हणत त्यांनी शरद पवारांच्या बाजूने असल्याचे आज जाहीर केले. तेव्हा प्रश्न उपस्थित होतोय तो की कोण आहेत हे युगेंद्र पवार? चला तर जाणून घेऊया. (Yugendra Pawar Who is Yugendra Pawar who says the same policy as grandfather would say)

युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत. शरयू Agro चे ते सीईओ आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी सातत्याने आजोबांना साथ दिली आहे. शरद पवार यांचे फोटो, व्हिडीओ, भाषणं सातत्याने सोशल मीडियावर शेअर करून आजोबांची बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता तेच युगेंद्र पवार काका अजित पवारांची साथ सोडून आजोबा शरद पवारांसोबत राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Reservation : आरक्षण टिकले तर मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकते; महाराष्ट्राचा हाच आहे इतिहास

काय म्हणाले युगेंद्र पवार?

बारामती लोकसभा मतदार संघ म्हणजे पवार कुटुंब आणि पवार कुटुंब म्हणजे बारामती अशी ओळख आहे. याच लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. असे असतानाच पवार कुटुंबातील चौथ्या पिढीतील तरुण युगेंद्र पवार यांनी काका अजित पवारांविरुद्ध दंड थोपाटले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Devendra Fadnavis : छत्रपती शिवराय हे आमचे दैवतच; कुर्ल्यात मंदिराचे उद्घाटन

त्यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार जे म्हणतील तसंच करणार. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराबाबत विचारले असता ते म्हणाले की, मला सुप्रिया सुळेंचा प्रचार करायला आनंद होईल. शरद पवार माझ्यासाठी दैवत आहेत, मी त्यांचा खूप आदर करतो. त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. मी खूप छोटा आहे. ते माझ्याबद्दल बोलले खूप चांगलं वाटलं. लोकसभा निवडणुकीत जर शरद पवारांनी सांगितलं तर प्रचार करीन, साहेब म्हणतील तसं, असं सूचक विधान युगेंद्र पवार यांनी केलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -