घरमहाराष्ट्रयुवासेनेच्या कार्यकर्त्याने अल्पवयीन तरुणीचा केला विनयभंग

युवासेनेच्या कार्यकर्त्याने अल्पवयीन तरुणीचा केला विनयभंग

Subscribe

सर्व नागरिकांच्या ही घटना लक्षात येताच आरोपीला चोपलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं.

सध्या एका युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या युवासेनेच्या कार्यकर्त्यांने धक्कादायक प्रताप केल्याची घटना समोर आली आहे. या कार्यकर्त्याने आपल्या गाडीत अल्पवयीन तरुणीला जबरदस्ती बसवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना समोर येताचं नागरिकांनी या आरोपीला चोपले असून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या आरोपीचं नावं सुमित खांदवे असं आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे.

नक्की काय घडलं?

या आरोपींने अमरावती मार्गाने येत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका अल्पवयीन तरुणीला आपल्या गाडीत बसण्याची जबरदस्ती केली. त्यानंतर त्याने तिच्याशी अंगलगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी आरोपीची गाडी अडवली आणि त्यानंतर त्या पीडितेची सुटका केली. मग सगळ्या संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या आरोपील बेदम मारहाण केली. त्यावेळेस आरोपीने दादागिरी करत मोठ्या लोकांची नाव सांगून नागरिकांना धमकावतं होता. मात्र नागरिक अजून संतापले आणि त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात केलं. याप्रकरणी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

ती पीडित तरुणी विद्यार्थिनी आहे. ही सर्व घटना यवतमाळ शहरात घडली आहे. या घटनेमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थीसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – चार तासांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल; कल्याण-डोंबिवली स्थानकावर तुफान गर्दी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -