घरमहाराष्ट्रजिल्हापरिषद अध्यक्ष पदाची सोडत जाहीर

जिल्हापरिषद अध्यक्ष पदाची सोडत जाहीर

Subscribe

राज्यातील एकूण ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या सोडत जाहीर

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या आरक्षित पदांचे जिल्हा परिषदनिहाय वाटप मंगळवारी मंत्रालयातील परिषद भवनात सोडत पार पडली. राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना बोलविण्यात आले होते त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षित जागांची संख्या ठरलेली असून आरक्षित पदांचे वाटप जिल्हा परिषदांना केले जाते. यावेळी राज्यभरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील एकूण ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या सोडत जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण

  • अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
  • अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
  • अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
  • अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड

नागरिकांचा मागास प्रवर्ग

- Advertisement -
  • ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
  • ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड

खुला (सर्वसाधारण) :

रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा

खुला (महिला) :

जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -