घरमहाराष्ट्रग्रामीण महाराष्ट्रासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

ग्रामीण महाराष्ट्रासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Subscribe

जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुका लांबणीवर

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या तसेच विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुका देखील काही कालावधीकरिता लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीबाबत मोठा निर्णय

या राज्यमंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, समिती सभापतीपदाच्या निवडणुका आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकांसह पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुका काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय

  • संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसह विधवा लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ.
  • सर्वांसाठी घरे धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील अतिक्रमणांबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय.
  • जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर.
  • राज्य निवडणूक विभाग नव्याने निर्माण करून त्यासाठी १२८ पदे निर्माण करण्याबाबत.
  • केंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेत मुंबईसह इतर डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या सक्षमीकरणाबाबत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील मौजा नवेगाव येथे केंद्रीय विद्यालयास भाडेपट्ट्याने जमीन देण्याबाबत.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र. ४ अकोला जिल्ह्यातील मौजा शिसा उदेगाव येथे भारत बटालियन क्र. ४ आणि जळगाव जिल्ह्यातील हातनूर येथे राज्य राखीव पोलीस गट स्थापन करण्यास मान्यता.
  • विद्यापीठ विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांबाबत निर्णय.
  • तिरुपती देवस्थान संस्थेसाठी शासकीय जागा देण्याबाबतचा निर्णय.
  • प्रगतीपथावरील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -