घरताज्या घडामोडीCoronavirus: मुंबईत २४ तासांत कोरोनाचे १४२१ नवे रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा ४८,५४९वर!

Coronavirus: मुंबईत २४ तासांत कोरोनाचे १४२१ नवे रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा ४८,५४९वर!

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांचा आकड्याने ८५ हजारांचा टप्पा गाठला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचा फैलाव मुंबईत झाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाचे १ हजार ४२१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ४८ हजार ५४९वर पोहोचला असून मृतांचा आकडा १ हजार ६३६ झाला आहे. तसंच मुंबईत २४ तासांत १ हजार २१८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत एकूण २१ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

तसेच मुंबईतील आज धारावीमध्ये आज १३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९१२वर पोहोचली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे आज धारावीत कोणाचाही मृत्यू झालेला नाही आहे. आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज  दादरमध्ये २४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे तर माहिममध्ये आज १३ जण सापडले आहेत. त्यामुळे दादरमध्ये एकूण बाधितांचा आकडा ४०८वर तर माहिममधील एकूण बाधितांचा आकडा ६३७ झाला आहे.


हेही वाचा – Coronavirus Update: राज्यात आज ३००७ नवे रुग्ण आढळले; ९१ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -