घरमुंबई९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वांटेड अबू बकरला दुबईत अटक

९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वांटेड अबू बकरला दुबईत अटक

Subscribe

अबू बकर अब्दुल गफूर शेख असे त्याचे पूर्ण नाव आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेला अबूबकरने मुंबईत आरडीएक्स पाठवण्यामागे महत्वाची भूमिका बजावली होती.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दुबईस्थित घरात शिजलेल्या १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट कटात सहभागी असलेला मोस्ट वांटेड अबू बकर याला दुबईत अटक करण्यात आली आहे. अबू बकर याची अटक ही भारतीय तपास यंत्रणेला मिळालेले मोठे यश असल्याचे मानले जात आहे. अबू बकर हा मुंबईत झालेल्या १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या कटातील महत्वाचा आरोपी आहे. अबू बकर अब्दुल गफूर शेख असे त्याचे पूर्ण नाव आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेला अबूबकरने मुंबईत आरडीएक्स पाठवण्यामागे महत्वाची भूमिका बजावली होती. अबू बकर हा मोहम्मद डोसासोबत अनेक प्रकारच्या तस्करीमध्ये सामील होता.

१९९७ मध्ये अबूबकर याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आल्यानंतर तो भारतीय तपास यंत्रणाच्या रडारवर होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अबूबकर हा दुबईत एका इराणी महिलेसोबत लग्न करून रहात होता. दुबईत त्याचे अनेक उद्योगधंदे असल्याची महिती समोर येत आहे. अनेक वर्षानंतर अखेर आता त्याला दुबईत अटक करण्यात आली आहे. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात अबूबकर हा मोस्ट वांटेड आरोपीपैकी एक आहे. अबूबकरला मुंबईत आणण्यासाठी भारतीय तपास यंत्रणेची प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -