घरमुंबईCorona: कल्याण डोंबिवलीत २३ नवे कोरोना रूग्ण; ५ मुलांचा समावेश

Corona: कल्याण डोंबिवलीत २३ नवे कोरोना रूग्ण; ५ मुलांचा समावेश

Subscribe

३० टक्के कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सोमवारी नवीन २३ कोरोना रूग्ण आढळून आले. यामध्ये एक महिन्याच्या बालिकेसह चार मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३४४ झाली आहे. आतापर्यंत १०४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रूग्णांची संख्या ३० टक्के आहे. सोमवारी आढळून आलेल्या रूग्णांमध्ये कल्याणामध्ये १८ रूग्ण डोंबिवलीत ३ तर मांडा टिटवाळा येथे १ रूग्ण आढळून आला आहे.

यामध्ये डोंबिवली पश्चिमेतील एक महिन्याची बालिका, कल्याण पूर्वेतील १५ वर्षीय मुलगा, १५ वर्षीय मुलगी, कल्याण पश्चिमेतील दोन मुलं वयवर्ष ९आणि वयवर्ष १५ असे एकूण पाच मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नव्या रूग्णांमध्ये पोलीस कर्मचारी, शासकीय रूग्णालयातील कर्मचारी, लॅब टेक्निशियन, बँकेतील कर्मचारी यांचा समावेश आहे. मुंबई व इतर ठिकाणी ये जा करणा-या कोरोनबाधित रूग्णांची संख्या १३७ असून त्यांच्यामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या ५९ झाली आहे. त्यामुळे ३४४ रूग्णांमध्ये १९६ रूग्ण हे मुंबईतील कर्मचारी आणि त्यांच्या सहवासात आलेले रूग्ण आहेत.


लॉकडाऊनमध्ये गावी पोहचविण्यासाठी व्हॅक्सीन व्हॅनचा वापर; पालिकेने बजावली नोटीस!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -