घरमुंबईमागीलवर्षी लोकल अपघातात २ हजार ९८१ नागरिकांचा मृत्यू

मागीलवर्षी लोकल अपघातात २ हजार ९८१ नागरिकांचा मृत्यू

Subscribe

मागील वर्षी लोकल दुर्घटनांमध्ये २ हजारहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार (आरटीआय) च्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.

मुंबईची उपनगरीय लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफ लाइनमधून दररोज ८० लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात मुंबईतील रेल्वेगाड्यांमध्ये तुफान गर्दी असते, ज्यामुळे प्रवाशी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दरवाजावर लटकून आणि उभे राहून प्रवास करतात. यामुळे दररोज सरासरी १० ते १२ प्रवासी रेल्वे गाड्यातून पडून रेल्वे किंवा रुळ क्रॉस करताना मरतात. भारतीय रेल्वेला मुंबईतील जास्त महसूल प्राप्त होतात तरीसुद्धा भारतीय रेल्वे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी गंभीर नाही, कारण मुंबईत रेल्वे रुळावर २०१७ सालाप्रमाणे २०१८ सालामध्ये काही विशेष बदल झाले नाही. जानेवारी २०१८ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत मुंबईतील रेल्वे रुळावर २ हजार ९८१ प्रवाशांना आपले जीव गमावावे लागेल आहे, तसेच ३ हजार ३४९ प्रवासी जखमी झाल्याची माहिती, माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त झाली आहे.

माहिती अधिकारातून मिळाली माहिती

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलीस यांच्याकडे जानेवारी २०१८ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे रुळ क्रॉस करताना किती लोकांच्या मृत्यू किवा जखमी झाले आहे याची माहिती मागितली होती. या संदर्भात मुंबई रेल्वे पोलीसाचे जनमाहिती अधिकारी यांनी माहिती पुरवली आहे. माहितीनुसार मुंबई उपनगरी रेल्वे रुळावर रेल्वेनगाड्यातून पडून किंवा रुळ क्रॉस करताना २ हजार ९८१ प्रवाशांना आपले जीव गमावले आहे, तसेच ३ हजार ३४९ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच मध्य रेल्वे मार्गावर एकूण १ हजार ९३३ प्रवाशांची मृत्यू आणि १ हजार ९२० प्रवासी जखमी झाले आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर मार्गावर एकूण १ हजार ४८ प्रवाशांची मृत्यू आणि १ हजार ४२९ प्रवासी जखमी झाले आहे.

- Advertisement -

या कारणांमुळे झाला प्रवाशांचा मृत्यू 

चालत्या गाडीतून पडून ७११ प्रवाशांची मृत्यू, १ हजार ५८४ जखमी.

खांबाचा फटका लागून १९ प्रवाशांची मृत्यू, ९० जखमी.

- Advertisement -

प्लाटफार्म वरून पडून लागून ६ प्रवाशांची मृत्यू, ८ जखमी.

वीजेचा शॉक लागून २२ प्रवाशांची मृत्यू, २५ जखमी.

आत्महत्या करून ३५ प्रवाशांची मृत्यू.

नैसर्गिक मृत्यू ५२२ प्रवाशांची मृत्यू, ६१७ जखमी.

अन्य कारणाने २९ प्रवाशांची मृत्यू, ७०२ जखमी.

अज्ञात कारणाने १८ प्रवाशांची मृत्यू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -