घरमुंबईनागपाडा येथे ३० वर्षांच्या सेक्स वर्कर महिलेची हत्या

नागपाडा येथे ३० वर्षांच्या सेक्स वर्कर महिलेची हत्या

Subscribe

नागपाडा येथे एका ३० वर्षांच्या सेक्स वर्कर महिलेची तिच्याच एका ग्राहकाने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नागपाडा येथे एका ३० वर्षांच्या सेक्स वर्कर महिलेची तिच्याच एका ग्राहकाने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली आहे. या हल्ल्यात शाहबाज मर्चंट नावाचा एक तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. जितेंद्र सिंग ऊर्फ जितू, असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावलयचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी सांगितले.


हेही वाचा – अंधेरीतील मसाज पार्लरमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

- Advertisement -

नेमके काय घडले?

नागपाडा येथील एम. आर रोड, कामाठीपुरा येथे रेश्मा (बदललेले नाव) ही ३० वर्षांची महिला कामाठीपुरा परिसरात तिच्या पतीसोबत राहते. ती सेक्स वर्कर म्हणून काम करीत होती. तिच्याकडे रविवारी जितू हा आला होता. यावेळी त्यांच्यात ठराविक रक्कमेवरुन वाद झाला होता. मात्र, तिने जितूकडून जास्त पैसे घेतले होते. उर्वरित पैसे परत मिळावे यासाठी त्याने तिच्याकडे तगादा लावला होता. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यातून त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीनंतर जितू तेथून निघून गेला. रविवारी रात्री साडेदहा वाजता तो पुन्हा तिथे आला. यावेळी त्याला रेश्मा दिसली. त्यामुळे त्याने पुन्हा तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. तिने पैसे देण्यास नकार देताच त्याने तिच्यावर त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने वार केले. तिच्या गळ्यावर, हातावर, बोटावर गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार तेथून जाणार्‍या शाहबाजच्या निदर्शनास येताच त्याने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, यावेळी रागाच्या भरात त्याने त्याच्यावरही तिक्ष्ण हत्याराने वार केले. ही माहिती मिळताच नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांना पाहताच जितूने पलायन केले. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करुन शिताफीने अटक केली. जखमी झालेल्या रेश्मासह शाहबाजला पोलिसांनी नायर रुग्णालयात दाखल केले, तिथे रेश्माला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर शाहबाजवर उपचार सुरु आहेत. हत्या आणि हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून नंतर पोलिसांनी जितेंद्र सिंग ऊर्फ जितूला अटक केली आहे. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत आहेत. जितू हा वसई येथे राहत असून त्याचा कॅटरिंगचा कंत्राट घेण्याचा व्यवसाय आहे. तो नहमीच कामाठीपुरा येथे येत होता. रविवारी तो रेश्माकडे आला होता. मात्र, त्यांच्यात आर्थिक वाद होऊन त्याने रागाच्या भरात तिची हत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी सांगितले.


हेही वाचा – गोवंडीत चौदा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -