घरमुंबईमालवणी येथील महिलेच्या हत्येप्रकरणी दोन आरोपी ताब्यात

मालवणी येथील महिलेच्या हत्येप्रकरणी दोन आरोपी ताब्यात

Subscribe

मालवणी येथील महिलेचा भिसीच्या पैशांवरुन हत्या केल्याची आरोंपीनी कबुली दिली आहे. मुख्य आरोपीस अटक तर दुसर्‍याची चौकशी सुरू आहे.

सहा दिवसांपूर्वी मालवणी येथे राहणार्‍या कंचन अजय सिंग ऊर्फ कंचन प्रमोद गुप्ता नावाच्या ४८ वर्षीय महिलेची हत्येचा पर्दाफाश करण्यात अखेर मालवणी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी अब्दुल रेहमान नाजीर शेख या मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याचा दुसरा सहकारी उबेद शेख याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोघांनीच भिसीच्या पैशांवरुन ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर अब्दुला सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालाडच्या मालवणी, कलेक्टर कंपाऊंड, गेट क्रमांक सात, प्लॉट क्रमांक ४४ च्या वन प्लास टू रुमच्या पहिल्या मजल्यावर कंचन ही तिच्या दोन मुलांसोबत राहते. तळमजल्यावर आणि दुसर्‍या मजल्यावर तिचे इतर कुटुंबातील सदस्य राहतात. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. एक मुलगा बंगलोर येथे नोकरी करीत असून दुसरा मुलगा दिपक हा एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे.

- Advertisement -

नक्की वाचा – अंधेरीतील मसाज पार्लरमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नक्की त्या रात्री काय घडले?

सोमवारी ७ ऑक्टोंबरला रात्री दिपक हा नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. सकाळी सहा वाजता तो घरी आला असता त्याला त्याची आई कंचन ही बेशुद्धावस्थेत दिसली. तिची काहीच हालचाल नव्हती, हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी कंचनला पोलिसांनी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

- Advertisement -

५० ते ६० सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांना यश

तिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. तसेच तिच्या गळ्यातील दागिन्यासह कपाटातील एक लाख रुपयांची कॅश चोरीस गेली होती. त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी रॉबरीसह हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील ५० ते ६० सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांना एक संशयित आरोपी दिसून आला होता. हा आरोपी अन्य कोणी नसून अब्दुल रेहमान शेख असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हेही वाचागोवंडीत चौदा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार

पैसे देण्यास नकार दिल्यामुळे….

चौकशीत अब्दुल हा कंचन राहत असलेल्या परिसरात राहत होता. कंचन ही तिच्या घरी भिसी चालवित होती. तसेच तिने घरातील रिपेरिंग साठी काही पैसे आणल्याची माहिती त्याला एका महिलेकडून समजली होती. ही कॅश चोरीच्या उद्देशाने त्याने उबेदच्या मदतीने गुन्ह्यांच्या रात्री तिच्या घरात प्रवेश केला होता. कंचनकडे या दोघांनी पैशांची मागणी केली. मात्र तिने पैसे देण्यास नकार देताच त्यांनी तिची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर त्यांना भिसीची रक्कम सापडली नाही. त्यामुळे तिच्या अंगावरील दागिने आणि कपाटातील रोख रक्कम घेऊन ते पळून गेले होते.

हत्येचा पर्दाफाश करुन दोन्ही मारेकर्‍यांना ताब्यात

या कबुलीनंतर अब्दुला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याचा दुसरा सहकारी उबेद हा नालासोपारा येथे राहत असल्याने तिथे एक टिम पाठविण्यात आली होती. त्याला उशिरा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. त्याचा या गुन्ह्यात सहभाग उघडकीस आल्यास त्याला उशिरा अटक करुन मंगळवारी कोर्टात हजर केले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मारेकर्‍यांविषयी काहीही माहिती नसताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या हत्येचा पर्दाफाश करुन दोन्ही मारेकर्‍यांना ताब्यात घेतले आहे.


हेही वाचानिवडणूक कार्यालयातील अधिकार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -