अंधेरीतील मसाज पार्लरमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अंधेरीतील एका मसाज पार्लरमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

pimpari chinchwad sex racket 4 arrested by police
'स्पा मसाज'सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अंधेरीतील एका मसाज पार्लरमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा शनिवारी वर्सोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नेहा शब्बीर सय्यद आणि मोहम्मद रफिक मोहम्मद जमील अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी पिटा कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली असून या सर्वांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

महिलेसह दोघांना अटक तर चार तरुणींची सुटका

अंधेरीतील वर्सोवा, म्हाडाजवळील एमटीएनएल सिग्नलजवळ रिफ्रेश वेलनस नावाचे एक मसाज सेंटर आहे. या मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालत असून तिथे काम करणार्‍या तरुणींना ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायासाठी पाठविले जात असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे एक बोगस ग्राहक पाठविला होता. या ग्राहकाने तिथे असलेल्या नेहा आणि मोहम्मद रफिककडे काही तरुणींची मागणी केली होती. त्यांनी ती मान्य करुन त्याला तिथे असलेल्या चार तरुणींना दाखवून त्याच्याकडून चार हजार रुपये घेतले होते. या ग्राहकाकडून इशारा मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकून या चारही तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत तिथे सेक्स रॅकेट चालत होते. नेहा आणि मोहम्मद रफिक हे दोघेही तिथे येणार्‍या ग्राहकांसोबत त्यांना पाठवित असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी पिटा कायद्यांतर्गत अटक केली आहे.

अटकेनंतर या दोघांनाही रविवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या चारही तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर या तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. तपासात नेहाविरुद्ध अशाच एका गुन्ह्यांची आंबोली पोलीस ठाण्यात नोंद असून तिला पोलिसांनी अटक केली होती. सध्या ती जामिनावर आहे. जामिनावर असताना तिला अशाच दुसर्‍या पिटा कायद्यांतर्गत अटक झाली आहे. या गुन्ह्यात इतर काही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


हेही वाचा – गोवंडीत चौदा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार