घरमुंबईसीईटी सराव चाचणीसाठी 55 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

सीईटी सराव चाचणीसाठी 55 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

Subscribe

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांची सीईटीची परीक्षा 2 ते 13 मेदरम्यान होत आहे. प्रथमच ही परीक्षा ऑनलाइन होत असल्याने विद्यार्थ्यांना होणार्‍या समस्या लक्षात घेऊन सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांसाठी सराव चाचणी घेण्यात येत आहे. सराव चाचणीला विद्यार्थ्यांकडून प्रंचड प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांत 55 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

इंजिनीयरिंगची सीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आल्यानंतर त्यादृष्टीने सेलकडून विद्यार्थ्यांना सराव करता यावा यासाठी प्रश्नसंचही उपलब्ध करून देण्यात आले, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या समस्येमुळे सरावासाठीचे प्रश्नसंच सोडवणेही मुश्कील होते. त्यामुळे सीईटी सेलकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. 15 एप्रिलपासून सुरू झालेल्या सराव परीक्षेला विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तब्बल 55 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ही परीक्षा ‘ऑफी’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोबाईल अ‍ॅपवर घेण्यात आली.

- Advertisement -

स्टार्टअप इंडिया अंतर्गत बनविण्यात आलेल्या ‘ऑफी’ अ‍ॅपमुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही इंटरनेटशिवाय ही परीक्षा देता आली. 15 व 16 एप्रिलला झालेल्या सराव परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप लक्षात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 16 एप्रिलला रायगडमध्ये सराव परीक्षा झाल्यानंतर 17 व 18 एप्रिलला पुणे, 20 एप्रिलला धुळे, नाशिक, उस्मानाबाद, 21 एप्रिलला अहमदनगर तसेच 20 व 21 एप्रिलला नागपूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सराव परीक्षा होणार आहेत. सराव परीक्षेनंतर नोंदणी करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. सराव परीक्षेची वेळ आणि ठिकाण मेल किंवा मोबाईलवर एसएमएसद्वारे विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार आहे. परीक्षेची व्यवस्था करण्याची जबाबदारी परीक्षा केंद्र असलेल्या संस्थेची असणार आहे.

नोदणीसाठी विद्यार्थ्यांना सूचना
मोबाईलद्वारे सराव चाचणी देण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती व सूचना मिळवण्यासाठी www.mahacet.org या वेबसाईटवर लक्ष ठेऊन राहावे, तसेच विद्यार्थ्यांनी आपले लॉगइन आयडी तपासावे, अशा सूचना सीईटी सेलकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -