घरताज्या घडामोडीदिलासादायक! मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील जलसाठा ९० टक्के

दिलासादायक! मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील जलसाठा ९० टक्के

Subscribe

मुंबईत सध्या पावसाने दडी मारली आहे. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील जलसाठा 90 टक्के झाला आहे.

मुंबईत सध्या पावसाने दडी मारली आहे. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील जलसाठा 90 टक्के झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणातील पाणीसाठा सध्या 90.01 टक्के आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी टंचाईचे संकट लवकरच दुर होणार आहे. (90 Percent Of The Water Storage In lake That Supplies Water To Mumbai)

सध्या 13 लाख 2 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा

- Advertisement -

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात सध्या 13 लाख 2 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्या तलाव क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाणी साठ्यात भरघोस वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळी वाढत नव्हती. परंतु, मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक वाढला आहे. दरम्यान, धरणाच्या पाणीसाठयात अजूनही 10 टक्के तूट आहे.

मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या सातही तलावांची पाणी साठवण्याची क्षमता साडे चौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे.

- Advertisement -

दरम्यान, पावसाळ्याचे चार महिने संपले की ऑक्टोबरमध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. यावेळी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर पाणी कपातीची आवश्यकता नसते.

वर्ष           दशलक्ष लिटर         टक्केवारी

२०२२         १३, ०२,७७५        ९०.०१ टक्के

२०२१         ११,५७,१६१          ७९.९५ टक्के

२०२०         ६,००,१५६           ४१.४७ टक्के


हेही वाचा – मेट्रोचा प्रवास आता रात्री उशिरापर्यंत; शेवटची गाडी सुटणार पावणे बारा वाजता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -