काम करा, अन्यथा घरी जा, केंद्रीय दूरसंचारमंत्र्यांची ऑडियो क्लिप व्हायरल

Indian IT Minister Ashwini Vaishnaw warns Twitter, says 'law of land supreme'
पहिल्याच दिवशी IT मंत्री अश्विनी वैष्णव यांचा Twitterला इशारा; म्हणाले, 'देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल'

नवी दिल्ली : भारताच्या ग्रामीण भागात मोठे नेटवर्क असलेल्या बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. ‘एक तर काम करा किंवा घरी जा,’ असा इशारा त्यांनी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राकडून 1.64 लाख कोटींच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रामीण भाग 4जी नेटवर्कने जोडण्याचेही उद्दीष्ट्य सरकारचे आहे. हे ध्यानी घेता केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या 62 हजार कर्मचाऱ्यांना पुढची दोन वर्ष भरपूर काम करण्यास सांगितले आहे. याबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना इशाराही दिला आहे. तुम्ही एक तर, काम करा, अन्यथा घरी जा. जे काम करणार नाहीत, त्यांना रेल्वेप्रमाणे सक्तीने व्हीआरएस दिली जाईल, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – रा. स्व. संघाचे तिरंग्याशी जुने नाते… सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितला किस्सा

25 हजार गावांमध्ये 4जी सेवा
केंद्र सरकारने अलीकडेच बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राकडून 1.64 लाख कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली. ग्रामीण भागात देखील 4जी नेटवर्क मजबूत करण्यात येणार असून त्यासाठी सरकारने 25 हजार गावांसाठी 26 हजार 316 कोटींचा अतिरिक्त निधी दिला आहे. सीमावर्ती भागातील गावात तसेच रिमोट एरियामध्ये देखील लवकरच 4जी सेवा येणार आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विन वैष्णव यांनी त्यावेळी दिली होती.

केंद्राकडून बीएसएनएलला आवश्यक ते स्पेक्ट्रम देण्यात येणार आहे. तसेच 4जी सेवेचा प्रसार करण्यासाठी आवश्यक तो वित्तपुरवठा केंद्राकडून केला जाणार आहे. शिवाय, सीमेनजीकच्या लडाखमध्ये देखील 4जी सेवा आणली जाणार आहे. कंपनी नेटवर्कच्या अपग्रेडेशनसाठी CAPEXला देखील मान्यता देण्यात आली असून, अपग्रेडेशनसाठी भारतीय उपकरणांचा वापर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. याशिवाय, बीएसएनएल आणि भारत ब्रॉडबँक नेटवर्क लिमिटेडच्या विलिनीकरणालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले होते.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं, ‘उद्धव ठाकरे गट’ असा केला उल्लेख